A 250 kg bomb from World War II was found in Lublin, Poland. Dainik Gomantak
ग्लोबल

World War 2 Bomb: पोलंडमध्ये सापडला दुसऱ्या महायुद्धातील विनाषकारी बॉम्ब

Poland: दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब पोलंडमध्ये यापूर्वीही अनेकदा सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी जर्मनीतील डसेलडॉर्फ शहरात 500 किलो वजनाचा बॉम्ब सापडला होता.

Ashutosh Masgaunde

A 250 kg bomb from World War II was found in Lublin, Poland:

पोलंडच्या लुब्लिन शहरात दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडला आहे. यानंतर, शहरातील सुमारे 14,000 लोकांना तात्पुरती घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकांना शाळा आणि इतर इमारतींमध्ये हलवण्यात आले. तसेच, त्यांना घरातील सर्व विद्युत उपकरणे, पाणी आणि गॅस बंद करण्यास सांगितले होते.

बांधकामाच्या ठिकाणी सापडलेल्या या बॉम्बचे वजन 250 किलो आहे. यानंतर बॉम्ब शोधक पथकाने बॉम्ब काढून निकामी केला.

बॉम्ब निकामी केल्यानंतर लोकांना घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब पोलंडमध्ये यापूर्वीही अनेकदा सापडले आहेत.

काही दिवसांपूर्वी जर्मनीतील डसेलडॉर्फ शहरात 500 किलो वजनाचा बॉम्ब सापडला होता. बॉम्ब सापडल्यानंतर 13,000 लोकांना तात्पुरते शाळांमध्ये हलवण्यात आले.

नवीन बांधकामासाठी निवासी भागात खाणकाम करताना जमिनीत पुरलेला 250-किलोग्राम वजनाचा बॉम्ब सापडला.

दुसर्‍या महायुद्धापूर्वी तेथे पोलिश विमानाचा कारखाना आणि विमानतळ होते जे युद्धकाळात नष्ट झाले असल्याची शक्यता आहे.

पोलंडमध्ये यापूर्वीही असे बॉम्ब सापडले आहेत

मागील महिन्यातही शाळेच्या नूतनीकरणादरम्यान काही तोफगोळे सापडले होते. गेल्या वर्षी पोलंडची राजधानी वॉर्सा (Warsaw) येथे 500 किलो वजनाचा बॉम्ब सापडला होता, त्यानंतर 30,000 लोकांना तात्पुरती घरे सोडावी लागली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT