migrants 
ग्लोबल

USA: अवैध पद्धतीने अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न, एका वर्षात 97,000 भारतीयांना अटक

बेकायदेशीरपणे अमेरिकेची सीमा ओलांडून पकडलेल्या भारतीयांची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत पाच पटीने वाढली आहे.

Pramod Yadav

USA: अवैध पद्धतीने सीमा ओलांडल्याबद्दल ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 दरम्यान अमेरिकेत 96,917 भारतीयांना अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण (UCBP) विभागाच्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

बेकायदेशीरपणे अमेरिकेची सीमा ओलांडून पकडलेल्या भारतीयांची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत पाच पटीने वाढली आहे. आकडेवारीनुसार, 2019-20 मध्ये 19,883 भारतीय पकडले गेले. 2020-21 मध्ये 30,662 भारतीयांना अटक करण्यात आली होती, तर 2021-22 मध्ये ही संख्या 63,927 होती.

ऑक्टोबर 2022 ते या वर्षी सप्टेंबरपर्यंत अटक करण्यात आलेल्या 96,917 भारतीयांपैकी 30,010 कॅनडाच्या सीमेवर आणि 41,770 मेक्सिकोच्या सीमेवर पकडले गेले.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये 84,000 भारतीय प्रौढ बेकायदेशीरपणे अमेरिकेत आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 730 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

अमेरिकन सरकारचे आर्थिक वर्ष 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर पर्यंत चालते. दरम्यान, फ्रान्ससारख्या देशातून मेक्सिकोला जाण्यासाठी काही लोक उड्डाणे करतात. त्यानंतर टोळ्यांच्या मदतीने ते सीमेवर जाण्यासाठी बसमध्ये चढतात, असे सिनेटर जेम्स लँकफोर्ड यांनी गुरुवारी सिनेटमध्ये सांगितले.

या वर्षात आतापर्यंत आम्हाला भारतातील 45,000 लोक सापडले आहेत ज्यांनी दक्षिण सीमा ओलांडली आहे. त्यांना आपल्या देशात भीती वाटते. लँकफोर्ड यांनी सिनेटमध्ये सांगितले की हे लोक मेक्सिकोला जाण्यासाठी फ्रान्ससारख्या देशातून अनेक वेळा जहाजांची मदत घेतात. मग काही तथाकथित दलालांच्या मदतीने ते सीमेवर जाण्यासाठी बसमध्ये चढतात. संबंधित एजंट त्यांच्यासाठी बसेसची व्यवस्थाही करतात, अशी माहिती यूएस सिनेटर लँकफोर्ड यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT