8 people dead 31 injured a in Bomb Attack in Kabul
8 people dead 31 injured a in Bomb Attack in Kabul 
ग्लोबल

साखळी स्फोटांनी काबूल हादरले

गोमन्तक वृत्तसेवा

काबूल : दहशतवाद्यांनी मोटारींमधून केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यांनी आज अफगाणिस्तानची राजधानी असलेले काबूल शहर हादरून गेले. शहराच्या विविध २३ भागांमध्ये झालेल्या या हल्ल्यात आठ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले. 

अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन मोटारींमध्ये बसून आलेल्या दहशतवाद्यांनी फिरत्या तोफांच्या साह्याने हे आज सकाळी हल्ले केले. विविध देशांचे दूतावास असलेल्या वझिर अकबर खान भागालाही त्यांनी लक्ष्य केले. या हल्ल्यांची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्यापपर्यंत स्वीकारलेली नाही. या हल्ल्यांमागे हात नसल्याचा खुलासा तालिबाननेही तातडीने केला. पोलिसांचा संशय ‘इसिस’वर असून गेल्या काही दिवसांत झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. 

आजच्या साखळी हल्ल्यांच्या एक तास आधी काबूलच्या पूर्व भागात एका मोटारीत लपवून ठेवलेल्या बाँबचा स्फोट होऊन एका सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात कतार येथे शांतता चर्चा सुरु असतानाच अफगाणिस्तानातील हल्ले वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने होत असलेल्या या चर्चेमध्ये संघर्ष कमी करण्याचे आवाहन अमेरिकेने वारंवार केले आहे. तालिबानने याकडे कधीही लक्ष दिलेले नाही. तालिबानी दहशतवादी अद्यापही जवळपास रोजच सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत हल्ले करत आहे. शांतता चर्चा सुरु करण्याआधी संघर्ष थांबवावा, असे आवाहन केले जात असले तरी तालिबानला ते मान्य नाही. शस्त्रसंधी हा चर्चेचाच भाग असावा आणि चर्चा समाधानकारक होत असेल तरच संघर्ष थांबेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा : 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Ponda Hospital : फोंडा इस्पितळात ऑगस्टपर्यंत सुविधा पुरवा: विजय सरदेसाई

‘’...सहमतीने संबंध ठेवणे चुकीचे म्हणता येणार नाही’’; HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

SCROLL FOR NEXT