77 people died in Nepal Floods landslide & heavy rain Twitter
ग्लोबल

नेपाळमध्ये पावसाचा प्रलय ,पूर आणि भूस्खलनामुळे 77 लोकांचा मृत्यू

नेपाळमध्ये (Nepal Floods) किमान 77 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले 34 मृतदेह सापडले आहेत मात्र बाकीचे अद्याप बेपत्ताच आहेत.

दैनिक गोमन्तक

गेल्या अनेक दिवसांपासून नेपाळमध्ये मुसळधार पावसाचे संकट उभे टाकले आहे (Nepal Heavy Rain). या सतत कोसळणाऱ्या पावसाने आणि पुराने (Nepal Floods) त्याचबरोबर अनेक ठिकणी भूस्खलनाच्या (Landslide) घटनाही दिसत आहेत. यामुळे नेपाळमध्ये किमान 77 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले 34 मृतदेह सापडले आहेत मात्र बाकीचे अद्याप बेपत्ताच आहेत.गृह मंत्रालयाचे अधिकारी दिल कुमार तमांग यांनी सांगितले की भारताच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व नेपाळच्या पंचथर जिल्ह्यात 24, शेजारच्या इलाममध्ये 13 आणि पश्चिम नेपाळमधील डोटीमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित लोक हे देशाच्या पश्चिम भागात मरण पावले आहेत.(77 people died in Nepal Floods landslide & heavy rain)

याबबाबत अधिक माहिती देताना गृह मंत्रालयाने सांगितले की 22 लोक जखमी झाले आहेत आणि 26 बेपत्ता आहेत. पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी पूर आणि भूस्खलन आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकार मृतांच्या कुटुंबियांना 1,700 डॉलर ची मदत आणि जखमींना मोफत उपचार देणार आहे . राजधानी काठमांडूच्या पश्चिमेला सुमारे 350 किमी पश्चिमेतील मुसळधार पावसामुळे पश्चिम नेपाळमधील सेती या गावापर्यंत पोहोचणेही कठीण झाले आहे. येथे दोन दिवसांपासून पुरात 60 लोक अडकले आहेत.

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या महिन्यानुसार , "खराब हवामान आणि संततधार पावसामुळे बचाव कार्य करणारे लोक गावात पोहोचू शकले नाहीत. बचावकार्य आजही सुरू आहे. टेलिव्हिजन वाहिन्यांवर दाखवले जात आहे की भात पिकाची पिके वाहून गेली आहेत आणि नद्यांना पूर आला आहे,आणि त्यामुळे पूल, रस्ते, घरे आणि शहरातील विमानतळपाण्याखाली गेली आहेत . देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये अडकलेल्या लोकांना नेपाळ आर्मी, नेपाळ पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने शोधून बाहेर काढले जात आहे.

येत्या काही दिवसांतही नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशाच्या हवामान विभागाने पुढील दोन दिवसांच्या पूर्वानुमानात म्हटले आहे की पूर्व पर्वतीय भागात मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. नेपाळ व्यतिरिक्त, भारताच्या उत्तराखंड राज्यात देखील पूर आला आहे. रविवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये मृतांची संख्या 52 वर पोहोचली आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. आणखी पाच जण बेपत्ता असल्याचेही सांगितले जात आहे. एकूण मृत्यूंपैकी 28 मृत्यू नैनीतालमध्ये नोंदवले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT