Kabul Airport Dainik Gomantak
ग्लोबल

काबुलमध्ये रक्तपात; तालिबान्यांचा गोळीबार, चेंगराचेंगरीत 7 ठार

Afghanistan Crisis: देश सोडण्याची इच्छा असणाऱ्या हजारो नागरिकांनी काबुल (Kabul) विमानतळावर गर्दी केली आहे.

दैनिक गोमन्तक

तालिबानने अफगाणिस्तानवर (Afghanistan Crisis) ताबा मिळवल्यानंतर मोठ्या संख्येने लोक देश सोडण्यासाठी धडपड करता आहेत. या प्रयत्नात, मोठ्या संख्येने लोक काबुल (Kabul) आंतरराष्ट्रीय विमानतळावर जमा झाले आहेत. विमानतळाजवळ आज रविवारी अफगाण नागरिकांमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली, या घटनेत सात अफगाणींचा मृत्यू झाला. काबूल विमानतळाजवळ झालेल्या गोंधळात सात अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला ब्रिटिश संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला आहे.

मागच्या कित्येक तासांपासून काबुल विमातळावर वातावर तापले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकिकडे तालिबानी नेते आपण हिंसा करणार नसल्याचे सांगत असताना दुसरीकडे तालिबानचे लोक दहशत निर्माण करताना दिसता आहेत. याच सर्व वातावरणात आज काबुलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तालिबान्यांनी गोळीबार केला.

गोळीबाराच्या भीतीने घाबरलेल्या लोकांचा जमाव बिथरला आणि मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये आता पर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. या घटनेता 40 लोक जखमी झाले असल्याचे समजते आहे.

आर्थिक संकट सुद्धा वाढलं

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने (Taliban) कब्जा केल्यानंतर सामान्य अफगाणी नागरिकांच्या समस्या सातत्याने वाढताने दिसता आहेत. जिवीताच्या सुरक्षेमूळे लोक देश सोडण्याची तयारी करत असून लवकरात लवकर देशाबाहेर पडण्यासाठी ते काबूल विमानतळावर रांगा लावून उभे आहेत. त्यातच आता बँकिंग सेवा बंद झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ तसेच बँकिंग सेवा स्थगित झाल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT