Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: या कारणांमुळे 67 टक्के तरुणांनी देश सोडण्याची इच्छा केली व्यक्त

Pakistan: याआधीच्या सर्वेमध्ये ही आकडेवारी 62 टक्के इतकी होती.

दैनिक गोमन्तक

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परकीय गंगाजळीचा तुटवडा निर्माण झाल्याने पाकिस्तानला देशासाठी आवश्यक वस्तूंची आयात करणेदेखील अशक्य झाले आहे.

पाकिस्तानमधील नागरिकांचे अतोनात हाल होत असून जीवनावश्यक दैनंदीन बाबींसाठी नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. वाढलेल्या महागाईने पाकिस्तानमधील नागरिक त्रस्त असल्याचे दिसून येत आहे.

आता पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ डेवलपमेंट इकोनॉमिक्स (पीआईडीई) ने केलेल्या अभ्यासानुसार, वाढलेल्या महागाईने जनता त्रस्त असून देशातील तरुण आता पाकिस्तानमध्ये राहू इच्छित नाहीत.

एका सर्वेनुसार देशातील 67 टक्के युवांनी देश सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याआधीच्या सर्वेमध्ये ही आकडेवारी 62 टक्के इतकी होती.

पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ डेवलपमेंट इकोनॉमिक्स (पीआईडीई) चे वरिष्ठ अर्थतज्ञ डॉ. फहीम जहांगीर खान यांनी म्हटल्यानुसार, देशातील चांगल्या संधीच्या शोधात पाकिस्तानमधून बाहेर पडू इच्छित आहे.

67 टक्के तरुणाईला योग्य आणि मोठ्या संधीची प्रतिक्षा आहे. पाकिस्तानमधील 31 टक्के तरुण शिक्षित बेरोजगार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

सर्वेतून समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान( Pakistan ) सोडण्याची इच्छा असलेल्या तरुणाईमध्ये सगळ्यात जास्त 15 ते 24 वयोगटातील तरुणाई असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, शहबाज सरकार महागाईवर मात करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरुन देशाला मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT