500 Corpses On Roof Dainik Gomantak
ग्लोबल

500 Corpses On Roof: पाकिस्तानातील रूग्णालयाच्या छतावर 500 मृतदेह

मुलतानमधील प्रकार; शरीराचे अंतर्गत आणि बाह्य अवयवदेखील गायब

गोमन्तक डिजिटल टीम

500 Corpses On Roof: पाकिस्तानच्या मुलतान शहरातील पंजाब निश्तार रूग्णालयातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रूग्णालयाच्या छतावर एक-दोन नाही तर चक्क 500 बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह कुजलेल्या स्थितीत आहेत.

विशेष म्हणजे, यातील अनेक मृतदेहांच्या शारीरिक अववय आणि शरिरांतर्गत अवयवही गायब आहेत. अनेक मृतदेहांची छाती उघडीच आहे. त्यांचे हृदय काढले गेल्याची शक्यता आहे.

येथील मुख्यमंत्र्यांचे सल्लागार चौधरी जमान गुर्जर यांनी रूग्णालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या सर्व मृतदेहांवर अंत्यंसंस्कार करण्याचे आदेश दिले. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना या प्रकरणाची संपुर्ण चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेशही दिले आहेत.

त्यानंतर दक्षिण पंजाबच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी 6 सदस्यांच्या एका पथकाची स्थापना केली आहे. या पथकाला तीन दिवसात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निश्तार मेडिकल विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने पाकिस्तानील डॉन या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या मृतदेहांचा वापर वैद्यकीय प्रयोगांसाठी केला जात होता. या मृतदेहांवर यापुर्वीच प्रयोग झालेले आहेत. आणि यापुढे वैद्यकीय वापरासाठी मृतदेहांची हाडे आणि खोपडी काढून ठेवण्यासाठी हे मृतदेह छतावर ठेवले गेले होते.

भारताकडून खरेदी करणार 60 लाख मच्छरदाण्या

पाकिस्तानातील आरोग्य क्षेत्राची स्थिती वाईट आहे. येथे जीव वाचवणारे एकही औषध मिळत नाही. रेबिज, कॅन्सरच्या औषधांसह मल्टी व्हिटॅमिन औषधांसाठीही पाकिस्तान भारतावर अवलंबून आहे. दरम्यान, पाकिस्तान महिनाभरापासून ते अधिक काळ पुराच्या समस्येचा सामना करत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने पाकिस्तानात डासांमुळे संसर्गजन्य रोग उद्भवू शकतात, असा इशारा दिला आहे. त्यानंतर पाकिस्तानने भारताकडून 60 लाख मच्छरदानी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT