Earthquake in Pakistan Twitte
ग्लोबल

बलुचिस्तानमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप, 80 घरे कोसळली, 200 कुटुंबे बेघर

अर्धा मिनिट भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी घराबाहेर उघड्यावर धाव घेतली.

दैनिक गोमन्तक

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात 5.2 तीव्रतेच्या भूकंपाने खुजदार जिल्ह्यात किमान 80 घरे कोसळली, 200 हून अधिक कुटुंबे बेघर झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू औरंजीजवळ असून शुक्रवारी सकाळी 11.55 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. डॉन वृत्तपत्रानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की सुमारे अर्धा मिनिट भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी घराबाहेर उघड्यावर धाव घेतली. मोठ्या धक्क्यांनंतर कमी तीव्रतेचे धक्के थोड्या अंतराने जाणवले. (Earthquake in Pakistan)

खुजदारचे उपायुक्त सेवानिवृत्त मेजर इलियास किबझाई यांनी डॉन वृत्तपत्राला सांगितले की, "भूकंपामुळे औरंजीचा मोठा भाग प्रभावित झाला आहे, ज्यामध्ये 80 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर 260 इतर घरांना प्रचंड भेगा पडल्या आहेत." भूकंपामुळे वाध तहसीलमधील नल, जामरी, बरंग आणि नचकन सोनारो लाठी गावातील घरांचेही नुकसान झाले आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही कारण बहुतेक लोक त्यांच्या घराबाहेर कामात व्यस्त होते, जे आत होते त्यांनी सुरुवातीच्या धक्क्यांनंतर घराबाहेर धाव घेतली.

घर कोसळल्यामुळे 200 हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत. भूकंपाची माहिती मिळताच भूकंपग्रस्त लोकांसाठी मदत सामग्री पाठवण्यात आली. किबझाई म्हणाले की, डोंगराळ भागामुळे बचाव आणि मदत पथकाला बाधित गावांमध्ये पोहोचण्यात अडचणी येत होत्या. आम्ही औषधांसह आरोग्य पथक पाठवले आहे.बाधित कुटुंबांना निवारा देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर अब्दुल कुदुस बिजेन्जो यांनी भूकंपामुळे स्थानिक लोकांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आणि भूकंपग्रस्त भागात तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासन आणि प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिले. भूकंपग्रस्त भागात तंबू, ब्लँकेट आणि इतर आवश्यक गोष्टींची तातडीने व्यवस्था करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री म्हणाले की, या कठीण काळात सरकार पीडितांच्या पाठीशी उभे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT