Narges Mohammadi  Dainik Gomantak
ग्लोबल

Nobel Peace Prize 2023: नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल जाहीर, इराणमधील महिलांसाठी...

Nobel Peace Prize: यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. इराणी कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Nobel Peace Prize: यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. इराणी कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

इराणमधील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची दखल घेत मोहम्मदी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मोहम्मदी यांनी इराणमधील लोकांसाठी मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष केला आहे.

नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल जाहीर होत असतानाही त्या तुरुंगातच आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये, इराणमधील महसा झिना अमिनी या तरुण कुर्दिश महिलेचा इराणी पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण इराणमध्ये (Iran) निदर्शने सुरु झाली. लोकांनी इराण सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यांनी महिलांना स्वातंत्र्य देण्याची मागणी केली. या निदर्शनात लाखो इराणी लोक सहभागी झाले होते.

रसायनशास्त्राच्या क्षेत्रात या शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर

याआधी काल, रसायनशास्त्र क्षेत्रातील 2023 चे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. यावर्षी हा सन्मान मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मौंगी जी यांना संयुक्तपणे देण्यात आला.

बावेंडी, कोलंबिया विद्यापीठातील लुईस ई. ब्रूस आणि नॅनोक्रिस्टल तंत्रज्ञानामध्ये काम करणारे अॅलेक्सी आय. एकिमोव्ह यांना क्वांटम डॉट्सचा शोध आणि संश्लेषणासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

कॅटालिन कारिको आणि ड्र्यू वीसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर

याआधी, सोमवारी फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रासाठी या सन्मान विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. या वर्षी कॅटालिन कारिको आणि ड्र्यू वीसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.

न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. या शोधामुळे कोरोनाव्हायरस म्हणजेच COVID-19 विरुद्ध प्रभावी mRNA लस विकसित करण्यात मदत झाली.

त्यांना संयुक्तपणे भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर

यानंतर मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. या श्रेणीसाठी 2023 चा नोबेल पुरस्कार संयुक्तपणे पियरे ऑगस्टिनी, फेरेंक क्रॉझ आणि अॅने ल'हुलियर यांना जाहीर करण्यात आला.

इलेक्ट्रॉनवरील अभ्यासासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार प्रायोगिक पद्धतींसाठी देण्यात आला, ज्यामध्ये पदार्थातील इलेक्ट्रॉनच्या गतिशीलतेचा अभ्यास करण्यासाठी प्रकाशाच्या एटोसेकंड पल्स निर्माण केल्या गेल्या.

2 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली

नोबेल पारितोषिकांची घोषणा सोमवारपासून वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सुरु झाली. 2 ऑक्टोबर रोजी वैद्यकशास्त्रासाठीचे नोबेल आणि 3 ऑक्टोबर रोजी भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.

रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 4 ऑक्टोबर आणि साहित्यासाठी 5 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. याशिवाय, अर्थशास्त्र क्षेत्रातील या पुरस्कार विजेत्याची घोषणा 9 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

दरम्यान, पुरस्कारांमध्ये 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर किंवा एक दशलक्ष यूएस डॉलर्स किंवा एक दशलक्ष डॉलर्सचे रोख पारितोषिक आहे. हा निधी पुरस्काराचे संस्थापक आणि स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांनी दिलेल्या मृत्युपत्रातून आला आहे. 1896 मध्ये त्यांचे निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT