Ganesh Chaturthi | Matoli Market in Banastari Goa 
ganesh chaturthi festival

Ganesh Chaturthi : बाणास्तारीत आजही माटोळी बाजार

बाणास्तारीचा प्रसिद्ध माटोळी बाजार सजला असून माटोळीचे सर्व प्रकारचे साहित्य येथे उपलब्ध आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ganesh Chaturthi : बाणास्तारीचा प्रसिद्ध माटोळी बाजार सजला असून माटोळीचे सर्व प्रकारचे साहित्य येथे उपलब्ध आहे. रविवार 28 रोजी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होती. आज सोमवार 29 रोजीही पूर्ण दिवस हा बाजार सुरू राहणार आहे. या बाजारात घाऊक पद्धतीने साहित्याची विक्री केली जाते, त्यामुळे येथे खरेदी करून इतर ठिकाणी पुढील दोन दिवस माटोळी साहित्य विकले जाते. त्यामुळे रविवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली.

नारळाच्या पेणी 300 रुपयांपासूून 600, 800 रुपयांनी विकल्या जात आहे. सुपारीचे कात्रे 300 ते 1000 आकाराप्रमाणे विक्री केली जात आहे. केळीच्या शिरत्या पन्नास नग 200 रुपये, माटोळी बांधण्यासाठी केवणीचा दोर पन्नास रुपये, कांगले, मावळींगे 50 रुपये, माटा 40 जोड, तोरंग 100 रु. आंबाडे पन्नास 100 रु., चिबूड 80 रु., निरफणस 100, 200 व 300 आकाराप्रमाणे दर आहेत. हळदीची पाने पंचवीस पाने 50 रु. असे दर आहेत. याशिवाय इतरही साहित्य मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे.

यावर्षी बाजारात रानटी, निसर्गातील फळे जास्त मुबलक प्रमाणात आहेत. कलमाची फुले व फळेही मोठ्या प्रमाणात आहेत. बाजारात माटोळी साहित्याच्या दरातही जास्त वाढ नाही. काही वनस्पती, फळांचे दर थोडे वाढलेले आहेत.

खाद्य तेलाच्या किमती काही प्रमाणात उतरल्या असून कडधान्याच्या दरात वाढ झालेली आहे. गणेश चतुर्थीमध्ये मखर सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत. तरी बाजारात आज खरेदीसाठी उत्साह होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT