Ganpati Dainik Gomantak
ganesh chaturthi festival

Ganesh Chaturthi: डिचोलीत गणेशमूर्तींवर फिरतोय कलाकारांचा अखेरचा हात

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला आता अवघे तीनच दिवस राहिल्‍याने डिचोलीत गणपतीच्या मूर्ती रंगविण्याच्या कामाला वेग आला आहे

दैनिक गोमन्तक

Ganesh Chaturthi: गोमंतकीयांचा सर्वांत आवडता व मोठा सण असलेल्‍या गणेश चतुर्थीला आता अवघे तीनच दिवस राहिल्‍याने डिचोली व परिसरातील चित्रशाळांमधून गणपतीच्या मूर्ती रंगविण्याच्या कामाला वेग आला आहे. सर्व चित्रशाळांमधून रात्री जागू लागल्या आहेत. मये, कारापूर येथील काही चित्रशाळांमध्‍ये तर पुरुष कलाकारांसह महिलाही रंगकाम करताना दिसून येत आहेत.

बालगोपाळांचा आनंद द्विगुणित करणारा आणि हिंदूंचा मोठा सण असलेला गणेश चतुर्थी उत्‍सव येत्या बुधवारी 31 ऑगस्‍टपासून सुरू होत आहे. डिचोली तालुक्यात शंभरहून अधिक चित्रशाळा आहेत. मये गावात सर्वाधिक चित्रशाळा आहेत. बहुतेक चित्रशाळांमधून रंगकाम करून गणपतीच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. कोविडमुळे गेल्या दोन वर्षात मूर्तीच्या आकारावर मर्यादा आली होती. यंदा मात्र चित्रशाळांमधून मध्यम आकारासह मोठ्या मूर्ती दिसून येत आहेत.

कारागिरांची कमतरता जाणवत असल्‍यामुळे डिचोली तालुक्यातील विविध चित्रशाळांमधून मूर्तिकारांबरोबरच त्‍यांची बायको-मुलेही रंगकामात मदत करताना दिसून येत आहेत. 75 वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या कारापूर येथील सज्जन गावकर यांच्या चित्रशाळेत त्यांच्या पत्नी आणि मुलांसह फाईन आर्ट (Fine Art) केलेली त्यांची पुतणी आशना गावकर ही युवतीही गणपतीच्या मूर्तीना रंग देण्याचे काम करीत आहे. आपल्‍या चित्रशाळेतील मूर्तीना डिचोली तालुक्याबरोबरच बाहेरूनही मोठी मागणी असते. यंदा चित्रशाळेत सुमारे साडेतीनशे मूर्ती तयार करण्‍यात आल्‍या आहेत, असे सज्जन गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

Viral video: विदेशी तरूणीनं पहिल्यांदाच खाल्लं भारतीय 'पान'; रिएक्शन पाहून नेटीझन्सना हसू आवरेना, व्हिडिओ व्हायरल!

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

SCROLL FOR NEXT