Kanpur UP Crime News  Dainik Gomantak
देश

कोट्यवधींचा मालक हळदीच्या अंगाने घराबाहेर गेला; लग्नाच्यापूर्वी प्रायव्हेट पार्ट कापून तरूणाची हत्या

पोलिसांना घटनास्थळावरून दारूचे रिकामे पाऊच आणि दोन ग्लास सापडले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

कानपूर, उत्तर प्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या तीन दिवस आधी एका तरुणाची हत्या करण्यात आली असून, त्याचे प्रायव्हेट पार्टही कापले आहेत. तरुणाचा मृतदेह शेतात पडलेला दिसल्यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी काही ग्रामस्थ दुपारच्या नदीकडे जात होते. यादरम्यान तारगाव येथील नीलम यादव यांच्या शेतात तरुणाचा मृतदेह दिसला. ही माहिती गावात पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली.

तत्काळ संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आढावा घेतला. पोलिसांना घटनास्थळावरून दारूचे रिकामे पाऊच आणि दोन ग्लास सापडले आहेत.

तरुणाने सफेद पॅन्ट आणि सफेद शर्ट परिधान केला होता. त्याचे वय 27 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले असून, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

धर्मेंद्र कुरील असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी त्याच्या हळदीचा सोहळा पार पडला. हळदीच्या अंगाने तो घराबाहेर पडला. तीन दिवसांनी त्याचे लग्न होते, मात्र लग्नाच्या अवघ्या तीन दिवस आधी त्याची हत्या करण्यात आली आहे.

दरम्यान, त्याची हत्या कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. पोलिस तरूणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे तपास करत आहेत.

रात्री तरुण बेपत्ता झाला, तेव्हा त्याच्या बेपत्ता झाल्याची माहिती नातेवाइकांनी पोलिसांना का दिली नाही. खून करताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात काय अर्थ आहे? या तरुणाकडे कोट्यवधींची मालमत्ता होती. त्याची हत्या कोण करू शकते? अशा मुद्यांच्या आधारे पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT