Crime News  Dainik Gomantak
देश

Video: धक्कादायक! फेसबुक लाईव्ह दरम्यान तरुणाने स्वतःवर झाडली गोळी

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बलिया येथून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.

दैनिक गोमन्तक

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बलिया येथून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. मिळालेल्या माहितीनुसार, बलिया जिल्ह्यातील एका व्यावसायिकाने फेसबुक लाईव्ह दरम्यान स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

पहिल्यांदा हा व्हिडीओ पाहा

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तो तरुण म्हणतो की, 'आम्हाला विनाकारण त्रास दिला जात आहे.' आम्ही सर्वांना पैसे दिले असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. मात्र, सर्व सावकारांनी मिळून आम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली.

पुढे तो तरुण म्हणतो की, 'माननीय योगीजी आणि मोदीजींनी आम्हाला मदत करावी. या लोकांनी आमचे घर लिहून घेतले आहे.' मला जगायचे नाही, असे तरुण म्हणतो. तो पुढे असेही म्हणतो की, 'माझ्या मुलांकडे लक्ष्य द्या, दुसरे काहीही मला नको...' त्यानंतर तो तरुण स्वतःवर गोळी झाडतो. तरुणाने स्वत:वर गोळी झाडल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.

नेमकं प्रकरण जाणून घ्या

व्हिडीओमध्ये तुम्ही सदर कोतवालीच्या मलगोदाम रोड स्टेशनवर बलिया आर्म्स कॉर्पोरेशनचे मालक नंदलाल गुप्ता यांना पाहत आहात. गुप्ता यांचे फेसबुक लाईव्ह पाहिल्यानंतर सर्वजण दुकानाकडे धावू लागले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दुकानात राहणारा मोनूही दुकानाकडे धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात (Hospital) नेले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT