paragliding in Kerala  Dainik Gomantak
देश

पॅराग्लायडिंग करताना महिला आणि ट्रेनर अडकले विजेच्या खांबावर

खांबाची उंची 50 फूट; पोलिसांनी खाली ठेवल्या गाद्या

Akshay Nirmale

Paragliding in Kerala: केरळमध्ये पॅराग्लायडिंगदरम्यान होणारा एक अपघात टळला आहे. तिरुअनंतपुरममधील वर्कला या पर्यटनस्थळी पापनाशम या बीचवर पॅराग्लायडिंग करताना एक 28 वर्षीय महिला आणि तिचा 50 वर्षीय पुरुष ट्रेनर असे दोघेही विद्युत खांबामध्ये अडकून बसले.

तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर या दोघांची सुटका करण्यात आली. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना मंगळवारची आहे. दोघेही पॅराग्लायडिंग करत असल्याचे दिसून येते. जमिनीवर उतरताना त्यांचे पॅराशूट विजेच्या खांबात अडकले.

खांबाच्या वर अनेक हाय-व्होल्टेज दिवे आहेत आणि दोन्ही पॅराग्लायडर 50 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या या खांबावर लटकले.

दोन तास हे दोघेही या खांबावर लटकलेल्या अवस्थेत होते. दोघांना वाचवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, परंतु अग्निशमन विभागाकडे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इतकी लांब शिडी नव्हती. यामुळेच दोघांनाही सुमारे दोन तास खांबाला लटकत राहावे लागले.

खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी खांबाखाली गाद्या आणि जाळी ठेवली होती. अनेक प्रयत्नांनंतर महिला आणि पॅराग्लायडिंग ट्रेनरची सुटका करण्यात आली. दोघांना वर्कला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठिक आहे.

दरम्यान, पॅराग्लायडिंगदरम्यान अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात पॅराग्लायडिंग करताना पडून दक्षिण कोरियातील एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

त्याचवेळी हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील डोभी भागात पॅराग्लायडिंग करताना महाराष्ट्रातील 30 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

Rahu Gochar 2026: राहु बनवणार अफाट श्रीमंत! 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राजयोगासारखे मिळणार फळ

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT