Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi Disqualified: वायनाड मतदारसंघात पोटनिवडणूक होणार की नाही?

निवडणूक आयोग काय करणार याकडे लक्ष; तर आयोगाचे राहुल गांधींच्या पुढील कृतीवर लक्ष

Akshay Nirmale

Rahul Gandhi Disqualified: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याप्रकरणी सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर शुक्रवारी राहुल यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले.

केरळमधील वायनाड येथून ते लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान, आता वायनाड येथे पोटनिवडणूक होऊ शकते किंवा कसे यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

तथापि, पोटनिवडणुकीची घोषणा करण्यापूर्वी निवडणूक आयोग कायदेशीर पैलूंवर अभ्यास करत आहे. राहुल गांधींनी वरिष्ठ न्यायालयात अपील आणि न्यायालयाच्या निर्णयावरही निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे.

कारण, एकदा वायनाड येथे पोटनिवडणूक जाहीर करून न्यायालयाचा निर्णय जर विरोधात असेल तर पुन्हा पोटनिवडणूक रद्द करायला लागू नये, यासाठी निवडणूक आयोग ही खबरदारी घेत आहे.

अलीकडेच लक्षद्वीपच्या खासदाराचे सदस्यत्व उच्च न्यायालयाने बहाल केल्यानंतर निवडणूक आयोगाला लक्षद्वीप पोटनिवडणूक रद्द करावी लागली होती. लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे सदस्यत्व खालच्या न्यायालयाने महाभियोग चालवल्यानंतर रद्द करण्यात आले होते.

यानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली. पण फैजल यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याने आयोगाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.

वेट अँड वॉच अशी भूमिका सध्या निवडणूक आयोगाने घेतली आहे. राहुल गांधींच्या आगामी कायदेशीर प्रक्रियेचा निकाल पाहण्यासाठी येत्या काही दिवसांची वाट आयोग पाहणार आहे. राहुल गांधींच्या कायदेशीर प्रक्रियेत लवकर निर्णय न झाल्यास निवडणूक आयोग पोटनिवडणूक जाहीर करेल.

काय आहे प्रकरण?

2019 मध्ये कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी यांनी 'सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?', असा सवाल केला होता. त्यावरून बरेच राजकारण झाले होते. त्यानंतर भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. राहुल गांधींनी संपूर्ण मोदी समाजाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT