Sachin pilot Dainik Gomantak
देश

Sachin Pilot in Delhi: काँग्रेस सोडणार की नवा पक्ष काढणार? सचिन पायलट यांच्या निर्णयाकडे लक्ष

आज दिल्लीला पोहोचणार; भाजप किंवा आपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

Akshay Nirmale

Sachin Pilot Protest in Delhi: राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट आज, बुधवारी दिल्लीला पोहोचणार आहेत. पायलट दिल्लीमध्ये त्यांची पुढची दिशा ठरवू शकतात.

गेल्या काही दिवसांत त्यांनी राजस्थानमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर भाजपमधील भ्रष्टाचाऱ्यांना अभय दिल्याचा आरोप केला आहे. त्या भाजप नेत्यांवर कारवाईसाठी पायटल उपोषणालाही बसले.

तरीही काहीही कारवाई न झाल्याने आज सचिन पायलट महत्वाचा निर्णय घेऊ शकतात. आता ते काँग्रेस पक्ष सोडणार, नवा पक्ष काढणार की, भाजप किंवा आम आदमी पक्षात प्रवेश करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पायलट यांच्याबाबत हायकमांडची भूमिका अजूनही मवाळ आहे.

त्यामुळे आज पायलट मोठा निर्णय घेऊ शकतात. त्यांनी काँग्रेस सोडल्याचीही चर्चा रंगली आहे. ते भाजप किंवा आपमध्ये प्रवेश करू शकतात, असे मानले जात आहे. आज ते दिल्लीत गेल्यावरच चित्र स्पष्ट होईल.

अशोक गेहलोत यांनी भाजप सरकारमधील भ्रष्टाचारावर कारवाई केली नसल्याची तक्रार सचिन पायलट यांनी केली आहे.

वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांच्या चौकशीचा मुद्दा पायलट उपस्थित करत आहेत. त्यांनी गेहलोत यांचे जुने व्हिडिओ दाखवून या प्रकरणांची चौकशी का झाली नाही, असा सवाल केला.

मात्र वसुंधरा राजे यांच्या बहाण्याने ते अशोक गेहलोत यांना लक्ष्य करत असल्याचे मानले जात आहे.

मागील भाजप सरकारच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचार प्रकरणाबाबत सचिन पायलट यांनी आपल्याच सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी सांगूनही सरकार त्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

आता मधल्या काळात ते दिल्लीला जाण्याच्या अटकळींनाही जोर आला आहे. ते आज (12 एप्रिल) दिल्लीत राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांची भेट घेऊ शकतात.

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी (12 एप्रिल) मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. रंधवा यांनी दिलेल्या इशाऱ्याला न जुमानता पायलट उपोषणाला बसले होते.

पक्षाचा कोणताही प्रमुख चेहरा किंवा विद्यमान आमदार त्यांच्यासोबत नव्हते तरी पायलट यांचे समर्थक मात्र तिथे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SAFF Championship: पाकिस्तानविना गोव्यात रंगणार 'सॅफ फुटबॉल स्पर्धा'; यजमान भारत, गतविजेत्या बांगलादेशसह एकूण सहा महिला संघांत चुरस

Omkar Elephant: 'ओंकार' पोचला उगाडे - सिंधुदुर्गात... सीमोल्लंघन सुरूच; पेडणे वन कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा

SCROLL FOR NEXT