Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: आत्ता काय खरं नाय...! नवरीनं लग्नात केक खाण्यास नकार दिल्यावर नवरदेवाचा संताप, पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

Viral Wedding Video: लग्नाचे वातावरण, रंगीबेरंगी सजावट, पाहुण्यांची लगबग आणि केक कापण्याचा सोहळा, सर्वकाही परिपूर्ण वाटत होते.

Manish Jadhav

Viral Wedding Video: लग्नाचे वातावरण, रंगीबेरंगी सजावट, पाहुण्यांची लगबग आणि केक कापण्याचा सोहळा, सर्वकाही परिपूर्ण वाटत होते. पण एका कृतीने आनंदी वातावरणावर पाणी फेरले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, जेव्हा नवरीने केक खाण्यास नकार दिला तेव्हा नवरदेवाला इतका राग आला की त्याने केकला लाथ मारुन आनंदी वातावरणावर पाणी फेरले.

आधी हा व्हिडिओ पाहा!

नवरीने केक खाण्यास नकार दिल्यावर नवरदेवाला राग अनावर

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये एक भव्य लग्नाचा स्टेज दिसतो. जिथे नवरा-नवरी केक कापणार असल्याचे दिसते. पहिल्यांदा शाही साडी परिधान केलेली नवरी मुलगी प्रेमाने केक कापून नवरदेवाला भरवते. पण जेव्हा नवऱ्या मुलाची नवरीला केक भरवण्याची पाळी येते तेव्हा ट्विस्ट पाहायला मिळतो. नवरदेव केकचा एक बाईट घेऊन नवरीला भरवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती खाण्यास नकार देते. तिचे हे वर्तन पाहून त्याला राग अनावर झाला. त्याने तडक केकच्या टेबलला लाथ मारुन आपला राग व्यक्त केला. त्यानंतर तो स्टेजवरुन खाली उतरुन तिथून निघून गेला.

व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ @Gharkekalesh नावाच्या अकाउंटवरुन सोशल साइट X वर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, 5 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आणि 5300 लोकांनी तो लाईक केला. अनेकांनी व्हिडिओवर कमेंटही केली आहे. एका युजरने व्हिडिओवर कमेंट केली की, "स्वाभिमानापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही." दुसऱ्याने लिहिले की, "लग्नापेक्षा भावाचा अहंकार मोठा होता."

तिसऱ्याने लिहिले की, "जर नवरीला केक खायला आवडत नसेल तर तिला जबरदस्ती का करावी? नवरदेवाने थोडा धीर धरायला हवा होता." चौथ्याने लिहिले की, "त्यांनी लग्नाचा एक दिवस आनंदाने साजरा करायला हवा होता, रागावण्याची घाई काय होती?" त्याचप्रमाणे, इतर अनेक लोकांनी देखील व्हिडिओवर कमेंट केली. काहींनी नवरदेवाच्या रागाला "बालिश" म्हटले. तर काहींनी लग्नासारख्या (Marriage) खास प्रसंगी इतका राग दाखवणे योग्य नाही, असे म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

SCROLL FOR NEXT