WhatsApp Latest Update | WhatsApp New Features Dainik Gomantak
देश

WhatsAppच्या नवीन 6 फीचरमुळे चॅटिंगमध्ये येणार थ्रिल

दैनिक गोमन्तक

WhatsApp हे सर्वांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलं आहे. जर काही कारणास्तव WhatsApp अवघ्या पाच दहा मिनिटांसाठी जरी डाऊन झालं तरी आपण लगेचच त्रस्त होऊन जातो. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी हे लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे असं म्हणायला हरकत नाही. WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते आपल्या युजर्स चॅटिंग आणखी गंमतीशीर व्हावं म्हणून नवनवीन फीचर्स आणते. आताही आपल्या युजर्ससाठी चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी 6 दमदार नवीन फीचर्स घेऊन मार्केट मध्ये आले आहे. (WhatsApp's new 6 feature will bring thrill in chatting)

WhatsApp हे सर्वांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलं आहे. जर काही कारणास्तव WhatsApp अवघ्या पाच दहा मिनिटांसाठी जरी डाऊन झालं तरी आपण लगेचच त्रस्त होऊन जातो. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी हे लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे असं म्हणायला हरकत नाही. WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते आपल्या युजर्स चॅटिंग आणखी गंमतीशीर व्हावं म्हणून नवनवीन फीचर्स आणते. आताही आपल्या युजर्ससाठी चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी 6 दमदार नवीन फीचर्स घेऊन मार्केट मध्ये आले आहे.

आउट ऑफ चॅट प्लेबॅक

WhatsApp चे हे फीचर युजर्संना व्हॉईस मेसेज चॅटबाहेर ऐकण्याची देखील सुविधा देणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, युजर व्हॉईस मेसेज ऐकत फोनमध्ये मल्टीटास्किंग सोबत दुसऱ्या मेसेजला रिप्लाय सुद्धा करू शकणार आहे.

पॉज किंवा रिज्यूम/ रेकॉर्डिंग

फीचरच्या मदतीने युजरला व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करताना काही अडचण आली तर त्याला थांबवून त्याच जागेपासून पुढे कंटिन्यू करता येणार.

रिमेंबर प्लेबॅक

रिमेंबर प्लेबॅक हे फीचर आल्याने युजर व्हॉईस मेसेज ऐकताना पॉज करू शकता किंवा त्याला पुन्हा त्याचजागेपासून सुरू करू शकता.

फास्ट प्लेबॅक ऑन फॉरवर्ड मेसेज

फास्ट प्लेबॅक ऑन फॉरवर्डेड मेसेज युजर्सला 1.5x आणि 2x स्पीडवर व्हॉईस मेसेज प्ले करण्याची सुविधा देतं आहे.

वेवफॉर्म व्हिज्युअलायजेशन

वेवफॉर्म व्हिज्युअलायजेशन युजर्सला साउंडचे व्हिज्यूअल्स रिप्रेजेंटेशन देणार आहे. यामुळे युजर्संना रेकॉर्डिंगमध्ये खूपच मदत मिळणार आहे.

ड्राफ्ट प्रीव्ह्यू

ड्राफ्ट प्रीव्ह्यू युजर्सला व्हॉईस नोट पाठवण्याआधी ती ऐकण्याची संधी देण्यात येणार आहे, म्हणजेच युजर ते पाठवण्याआधी एकदा ऐकून एडीट करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT