WhatsApp Dainik Gomantak
देश

मध्यरात्री व्हॉट्सअ‍ॅप ठप्प; वापरकर्त्यांचा एलन मस्कला 'मेसेज'

"एलन मस्क कृपया तुम्ही व्हाट्सएप खरेदी करा."

दैनिक गोमन्तक

जगभरात वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) मध्यरात्री अचानक ठप्प झाले होते. 29 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 1.30 ते पहाटे 3 वाजेपर्यंत ते काम थांबले होते. हजारो वापरकर्त्यांनी याबद्दल तक्रार नोंदवली आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ना मेसेज केले जात होते ना व्हिडिओ कॉलिंग केले जात होते. अनेक यूजर्सने ट्विटरवर आपला राग व्यक्त केला, काहींनी तर टेस्लाचे सीईओ आणि अलीकडील ट्विटर खरेदीदार एलन मस्क यांना व्हॉट्सअ‍ॅप खरेदी करण्याची विनंती केली आहे. (WhatsApp stopped working middle of the night users ask Elon Musk to buy whatsapp)

व्हॉट्सअॅपचे अधिकृत विधान,

मध्यरात्री, व्हॉट्सअ‍ॅपने त्यांचे अधिकृत विधान जारी केले, त्यात लिहिले आहे की, "तुम्हाला सध्या व्हॉट्सअ‍ॅप वापरताना काही समस्या येत असतील, आम्ही सर्व गोष्टी पुन्हा सुरळीतपणे चालवण्यासाठी काम करत आहोत. आम्ही ते अपडेट करण्यासाठी काम करत आहेत, तुमच्या संयमाबद्दल धन्यवाद." यानंतर, दुपारी 3 वाजता आणखी एका ट्विटमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले की, अ‍ॅपने पुन्हा काम करण्यास सुरुवात केली.

"इलॉन मस्क WhatsApp विकत घ्या"

एका वापरकर्त्याने लिहिले की, "एलन मस्क उद्या व्हॉट्सअ‍ॅप हेड क्वार्टरमध्ये खरेदी करण्यासाठी येत आहेत." तर दुसर्‍याने लिहिले की, "एलन मस्क कृपया तुम्ही व्हाट्सएप खरेदी करा."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT