B.S. Yeddyurappa Dainik Gomantak
देश

कानडीत 'मी पुन्हा येईन' ला काय म्हणतात; आमदाराला 'हे' मिळालं उत्तर

कॉंग्रेस आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

कर्नाटकमधील भाजपचे बडे नेते बी.एस. येडीयुरप्पा (B.S. Yeddyurappa) यांनी अखेर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे राज्यपाल थालरचंद गेहलोत (Thalarchand Gehlot) यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा येडीयुरप्पा यांनी सोपवला. त्यानंतर येडीयुरप्पा यांच्याकडे कोणती मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहीले असतानाच यासंबंधीचा त्यांनी स्वत:च खुलासा केला आहे. यापुढे फक्त आपण राज्याच्या कल्याणार्थ काम करणार आहोत, असे ते म्हणाले. मात्र कर्नाटकातील राजकिय समीकरणावर महाराष्ट्रातील कॉंग्रेस आमदाराने सोशल मिडियावरील ट्विटरवरुन एक खोचक ट्विट केले आहे. या ट्विटमधून कॉंग्रेस आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभेतील भाषणात मी पुन्हा येईन हा राग आवळला होता. तसेच राज्याचे पुन्हा एकदा आपणच मुख्यमंत्री होणार हा कोरडा आशावादही त्यांनी व्यक्त केला होता. मात्र महाराष्ट्रात अखेर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. दरम्यान प्रचारसभेत फडणवीस यांचे मी पुन्हा येईन हे वाक्य राज्यभर चांगलंच गाजलं होतं.

या वाक्यावरुन सोशल मिडियार प्रचंड प्रमाणात ट्रोलही करण्यात आले होते. यातच आता धुळे ग्रामीण भागाचे सध्याचे आमदार कुणाल पाटील यांनी हाच धागा पकडत कर्नाटकच्या राजकिय घडामोडीवर भाष्य करत फडणवीस टीकेच्या माध्यमातून कोपरखळी मारली आहे. पाटील यांनी मी पुन्हा येईनला... कन्नड भाषेत नेमकं काय म्हणतात.. असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रश्नावर काहींकडून उत्तरही देण्यात आली आहेत... तर दुसरीकडे काहींनी कन्नड भाषेतच उत्तर देणं पसंत केले आहे.

दरम्यान, येडीयुरप्पा म्हणाले, मी स्वता:चं राज्य सोडून कुठेही जाणार नाही. राज्याच्या कल्याणासाठी काम करणार आहे. मात्र आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा कोणाच्याही दबावाखाली राहून दिला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT