Court Dainik Gomantak
देश

'अकबर' आणि 'सीता', नावाच्या वादावरुन विश्व हिंदू परिषदेची हायकोर्टात धाव; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Siliguri Forest Lions Names Controversy: विश्व हिंदू परिषदेने त्यांच्या नावावर आक्षेप घेतला आहे. हिंदू आणि मुस्लिम नावे असलेले सिंह आणि सिंहीण एकत्र कसे राहू शकतात?

Manish Jadhav

Siliguri Forest Lions Names Controversy: पती-पत्नीमधील भांडणे, घरगुती हिंसाचार, विनयभंग, मारहाण, भ्रष्टाचार अशी अनेक प्रकरणे हायकोर्टाच्या दारापर्यंत पोहोचलेली तुम्ही पाहिली असतील, पण नावावरुन वाद हायकोर्टात पोहोचल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? नाहीतर आता ऐका, 'अकबर' आणि 'सीता' यांच्या नावावरुन बराच वाद सुरु आहे आणि विरोध करणाऱ्यांनी हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे. 16 फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती सौगता भट्टाचार्य यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावर 20 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. ही नावे बदलण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. हे प्रकरण दोन मुक्या प्राण्यांशी संबंधित आहे.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, हे प्रकरण पश्चिम बंगाल राज्यातील सिलीगुडी येथील आहे. ज्यांच्या नावावर वाद होत आहे ते सिंह आणि सिंहिणी आहेत. सिंहाचे नाव 'अकबर' आणि सिंहिणीचे नाव 'सीता' आहे. दोघांनाही नुकतेच त्रिपुरातील सिपाहिजाला प्राणी उद्यानातून आणून सिलीगुडीच्या जंगलात सोडण्यात आले, मात्र विश्व हिंदू परिषदेने त्यांच्या नावावर आक्षेप घेतला. हिंदू आणि मुस्लिम नावे असलेले सिंह आणि सिंहीण एकत्र कसे राहू शकतात? असा सवाल उपस्थित करुन विश्व हिंदू परिषद गदारोळ माजवत आहे. विहिंप सदस्यांचे म्हणणे आहे की, 'अकबर'च्या मादीला 'सीता' असे नाव देणे म्हणजे हिंदू धर्माचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे नाव बदलण्याची मागणी होत आहे.

ममता सरकारला उत्तर द्यावे लागेल

दुसरीकडे, या प्रकरणात राज्याचे वन अधिकारी आणि सफारी पार्क संचालकांना पक्षकार बनवण्यात आले आहे. वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सिंह आणि सिंहिणीला ही नावे सिलीगुडीला आणण्यापूर्वीच देण्यात आली होती. वन्य प्राण्यांच्या नावावरुन देशात पहिल्यांदाच वाद झाला असून तो हायकोर्टात पोहोचला आहे. या प्रकरणाचा तपास पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारपर्यंत पोहोचू शकतो, कारण थेट सरकारला उत्तर द्यावे लागेल. तर विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी ट्विट करुन हे प्रकरण धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी लिहिले की, सिंह आणि सिंहिणीची हिंदू मुस्लिम नावे कोणी दिली हे कळले पाहिजे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT