Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

Udaipur: 'या प्रकरणी कायदा कारवाई करेल', कन्हैया लालच्या निर्घृण हत्येवर ममता बॅनर्जींचं वक्तव्य

कन्हैया लालचा मृतदेह काही वेळात रुग्णालयातून त्याच्या घरी पोहोचणार आहे.

दैनिक गोमन्तक

Udaipur tailor Murder Case: काल राजस्थानमधील उदयपूरमध्ये भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने संतप्त झालेल्या दोघांनी एका हिंदू टेलरची निर्घृण हत्या केली. टेलर कन्हैया लालच्या हत्येनंतर मारेकऱ्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. या घटनेनंतर उदयपूरसह संपूर्ण राजस्थानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेचा निषेध करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर लिहिले की, "हिंसा आणि अतिरेकी काहीही असो, अस्वीकार्य आहे! उदयपूरमध्ये घडलेल्या प्रकाराचा मी तीव्र निषेध करते. या प्रकरणी कायदा स्वतःहून कारवाई करेल, मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करते."

राजस्थानमधील उदयपूरमध्ये कपडे शिवण्याच्या बहाण्याने दुकानात घुसलेल्या मारेकऱ्यांनी शिंपी कन्हैया लालची धारदार हत्याराने निर्घृण हत्या केली. या हत्याकांडानंतर उदयपूरमध्ये हिंसाचाराची काही प्रकरणेही समोर आली आहेत. इतिहाटन परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैया लालचा मृतदेह काही वेळात रुग्णालयातून त्याच्या घरी पोहोचणार आहे. जिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कन्हैया लालच्या कुटुंबीयांनी केली मोगणी

उदयपूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कन्हैया लालच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, या हत्येत 20-25 जणांचा समावेश आहे. या सर्वांना अटक करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हत्येच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीनेही आपले काम सुरू केले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

SCROLL FOR NEXT