West Bengal Chief Minister Mamata Banerjee  DainiK Gomantak
देश

'नरेंद्र मोदी देव आहेत का?' ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

Mamata Banerjee Vs Narendra Modi: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'नरेंद्र मोदी देव आहेत का?' असा सवाल उपस्थित करत ममतांनी हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'सध्या प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडले असून त्यावर चर्चाही होत नाही.' केंद्र सरकारवर निशाणा साधताना त्या पुढे म्हणाल्या की, अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. भाव वाढत आहेत. बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे.'

दरम्यान, माध्यमाशी संवाद साधताना ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) विचारण्यात आले की, भाजपकडे (BJP) नरेंद्र मोदी आहेत, तेव्हा विरोधकांचा चेहरा कोण? यावर ममता संतापल्या. त्या म्हणाला, 'मोदी देव आहेत का?' ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, 'नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांचा आपल्याला आदर आहे. पण ते देव नाहीत'.

ममता पुढे म्हणाल्या की, देशातील उद्योगांची काय अवस्था झालीय तुम्हाला चांगलंच माहिती आहे. एक लाखाहून अधिक उद्योगपती देश सोडून परदेशात स्थलांतरित झाले, ही शरमेची बाब आहे." त्या पुढे म्हणाल्या, "जर माझ्याकडून मोठी चूक झाली असेल तर ती माझी चूक आहे आणि ते माझ्यावर कारवाई करु शकतात. पण जेव्हा तुम्ही पीएमकेअर्सच्या नावावर पैसे घेता तेव्हा हे पैसे कुठून आले हे कोणी विचारु शकत नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT