Odisha Train Accident
Odisha Train Accident Dainik Gomantak
देश

Odisha Train Accident : ...तर 288 निष्पापांचे प्राण वाचले असते! CBI कडून चौकशी सुरू असतानाच समोर आली धक्कादायक माहिती

Ashutosh Masgaunde

CBI Enquiry of Odisha Train Accident

काही दिवसांपूर्वी ओडिशातील बालासोर येथे रेल्वे अपघात झाला होता. यामध्ये 288 जणांना आपला जीव गमवावा लागला. या रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला. या अपघाताचा सध्या सीबीआयकडून तपास सुरू असून, दरम्यान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेच्या काही आठवडे आधी रेल्वे बोर्डाने सर्व विभागप्रमुखांना सावध केले होते. तुमच्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे शेकडो लोकांचे प्राण जातील, असे सर्वांना सांगण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र रेल्वे सतर्कतेनेही हा अपघात टळू शकला नाही.

सध्या ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआयही चौकशी करत आहे. प्रत्येक अ‍ॅंंगलने तपास केला जात आहे. रेल्वे बोर्डाने एप्रिलमध्ये सर्व झोनल मुख्य अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना असुरक्षित घटनांविरूद्ध शॉर्टकट पद्धती टाळण्यास सांगितले होते. शॉर्ट कट पद्धतीचा वापर केल्यामुळे घडलेल्या पाच दुर्घटनांचाही त्यांनी उल्लेख केला होता.

कित्येकवेळा ट्रॅकवरील देखभाल दुरुस्ती केल्यानंतर त्याची तपासणी न करता, सिग्नलिंग गियर पुन्हा जोडले जातात. त्याची संपूर्ण सुरक्षा तपासणी होत नाही.

या घटना चिंताजनक असल्याचे सांगत, मंडळाने सर्व सर व्यवस्थापकांना विभागीय आणि मुख्यालय स्तरावर आयोजित सुरक्षा बैठकांमध्ये दर आठवड्याला या पैलूंचा आढावा घेण्यास सांगितले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले.

रेल्वे बोर्डाने निकष ठरवून दिले आहेत

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वेने अनेक निकषे ठरवली आहेत. उदाहरणार्थ, जर ट्रॅकची देखभाल केली गेली असेल तर प्रथम त्यांची योग्य तपासणी केली जाईल. त्यानंतरच ते सिग्नलिंग गिअरशी जोडले जाईल. पण सिग्नलिंग आणि टेलिकॉम कर्मचारी घाईघाईत आणि काम टाळण्यासाठी ते जोडतात.

सुरुवातीच्या कामादरम्यान चुकीची वायरिंग, सिग्नल अबाधित ठेवणे… ही काही निकषे आहेत, जी तुम्ही अपघात टाळण्यासाठी पाळू शकता. अशा चुका झाल्या तर तुम्ही रेल्वेचे कोड मॅन्युअल कमकुवत करत आहात, असा इशारा बोर्डाने दिला होता.

रेल्वे बोर्डाच्या पत्राकडे दुर्लक्ष

बालासोर येथे 2 जून रोजी अपघात झाला त्याच्या दोन महिने आधी रेल्वे मंडळाने सहा जनरल मॅनेजरना पत्र पाठवून सूचना केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

कोलकाता-चेन्नई (कोरोमंडल एक्स्प्रेस), बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला. त्याचे दोन तपास सध्या सुरू आहेत.

एका प्रकरणी, रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) तपास करत आहेत आणि दुसरी सीबीआय चौकशी सुरू आहे. वारंवार सूचना देऊनही स्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असे वारंवार घडून येत असल्याचेही बोर्डाने पत्रात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT