Weather Updates  Dainik Gomantak
देश

Weather Updates: अनेक राज्यांमध्ये 3 फेब्रुवारीपासून पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता

हवामान खात्याने उत्तर भारतीय राज्यांमध्ये पुढील 24 तास थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

दैनिक गोमन्तक

देशाची राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तास उत्तर भारतीय राज्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार आहे. भारतीय हवामान खात्यानेही (IMD) अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर पश्चिम हिमालयीन भागात 2 ते 4 फेब्रुवारीदरम्यान पावसासह हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.

जाणून घ्या कोणत्या राज्यात कसे असेल हवामान

दिल्ली:

या संपूर्ण आठवड्यात पाऊस पडणार नाही, असे हवामान खात्याने सांगितले आहे. मात्र थंडीची लाट कायम राहणार असून 3 फेब्रुवारीला दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश:

पर्वतांवर झालेल्या हिमवृष्टीचा परिणाम संपूर्ण उत्तर भारतात दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात थंडीची लाट आली आहे. लखनऊमध्ये कमाल तापमान 18 अंश तर किमान तापमान 20 अंश राहण्याचा अंदाज आहे.

जम्मू-काश्मीर

काश्मीरमध्ये थंडीची लाट पसरली आहे. पुढील काही दिवस असेच वातावरण राहणार असून 31 जानेवारीपासून राज्यातील अनेक भागात पाऊस (Rain) आणि बर्फवृष्टी (snow) होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राजस्थान

राजस्थानमध्ये आणखी काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत जयपूर आणि उदयपूरसारख्या शहरांमध्ये तापमानात चढ-उतार होऊ शकते असे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.

पंजाब

या राज्यात सध्या कडाक्याची थंडी आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन तीन दिवस थंडी कायम राहणार आहे. आज पंजाबमध्ये (Punjab) कमाल आणि किमान तापमान 5 अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT