India Champions vs Pakistan Champions Dainik Gomantak
देश

IND vs PAK: रविवारी रंगणार भारत–पाकिस्तान महामुकाबला! किती वाजता सुरू होणार? कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती

India Champions vs Pakistan Champions: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ (WCL २०२५) सुरू झाली आहे. ही स्पर्धा २ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

Sameer Amunekar

WCL 2025, India Champions vs Pakistan Champions

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ (WCL २०२५) सुरू झाली आहे. ही स्पर्धा २ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानसह एकूण सहा संघ सहभागी आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' कारवाईनंतर, कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षणीयरीत्या वाढला होता. असे मानले जात होते की हे दोघेही बऱ्याच काळानंतर क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांसमोर येतील, परंतु आता प्रतीक्षा संपली आहे. रविवार २० जुलै रोजी इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात एक जबरदस्त टक्कर होईल.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवार, २० जुलै रोजी रात्री ९:०० वाजता एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होईल.

सामना कुठे पाहता येणार शकतो?

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर केले जाईल. त्याच वेळी, तुम्ही फॅनकोड अॅपवर थेट प्रक्षेपण पाहू शकता.

भारताचा संघ

युवराज सिंग (कर्णधार) शिखर धवन, हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण, पियुष चावला, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, विनय कुमार, वरुण आरोन, स्टुअर्ट बिन्नी, अभिमन्यू मिथुन, सिद्धार्थ कौल, गुरकीरत मान.

पाकिस्तानचा संघ

मोहम्मद हाफिज (कर्णधार), शोएब मलिक, सरफराज अहमद, शरजील खान, वहाब रियाज, आसिफ अली, शाहिद आफ्रिदी, कामरान अकमल, आमिर यामीन, सोहेल खान, सोहेल तन्वीर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा काँग्रेस नेत्यांना घेतलं ताब्यात

Goa Congress Protest: 28 मतदार एकाच खोलीत? निवडणूक अधिकाऱ्यांची अचानक नेमणूक; काँग्रेसचा मोठा आरोप

Govt Raises Gambling Fines: सरदेसाईंच्या स्टिंग ऑपरेशननंतर सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर, जुगार दंडात केली मोठी वाढ

Cutbona Jetty: कुटबण जेटीवर SOP लागू! मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन; कामगारांची तपासणी सुरू

Bhausaheb Bandodkar: गोवा मुक्त होण्यापूर्वी, अनेक भागांत ‘भाऊसाहेब’ हे नाव लोकप्रिय होते..

SCROLL FOR NEXT