भारतीय क्रिकेटचा 'किंग' म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली केवळ फलंदाज म्हणूनच नाही, तर त्याच्या फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध आहे. आजवरच्या आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने स्वतःला फक्त तंदुरुस्तच ठेवले नाही, तर इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरणही ठरले आहे. भारतातील आणि परदेशातील क्रिकेटपटूही कोहलीच्या फिटनेसची सतत प्रशंसा करत असतात.
आज अनेक तरुणांना विराट कोहलीसारखे फिट आणि तंदुरुस्त शरीर हवे असते. पण योग्य माहिती आणि शिस्तीअभावी त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. म्हणूनच, कोहलीच्या दिनचर्येबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याच्या सकाळच्या सवयी आणि फिटनेसबाबतची शिस्त हीच त्याच्या यशामागील खरी गुरुकिल्ली आहे.
१) हायड्रेशन – शरीराला ऊर्जेचा पुरवठा
विराट कोहलीच्या दिवसाची सुरुवात होते ती स्वतःला नीट हायड्रेट करून. सकाळी उठल्यानंतर तो भरपूर प्रमाणात पाणी किंवा अन्य हायड्रेटिंग द्रवपदार्थ घेतो. यामुळे वर्कआउट दरम्यान शरीरातील पाण्याचा तोल राखला जातो आणि ऊर्जा कमी होत नाही. हायड्रेशनमुळे त्वचा ताजीतवानी राहते आणि थकवा जाणवत नाही.
२) स्ट्रेचिंग – स्नायूंना लवचिकता मिळवून देणारी क्रिया
हायड्रेशननंतर विराट थोडीशी ब्लॅक कॉफी घेतो आणि त्यानंतर स्ट्रेचिंग करतो. स्ट्रेचिंगमुळे शरीरातील स्नायूंना विश्रांती मिळते आणि जिममध्ये वर्कआउट करताना दुखापतीचा धोका कमी होतो. स्ट्रेचिंग केल्याने स्नायू लवचिक राहतात आणि वर्कआउटच्या आधी शरीर व्यवस्थित गरम होते.
३) वर्कआउट – घामाच्या धारा आणि शुद्ध शरीर
स्ट्रेचिंगनंतर विराट कोहली जिममध्ये घाम गाळतो. त्याचा वर्कआउट सेशन नेहमी उच्च दर्जाचा असतो. वर्कआउटमुळे शरीरातील अशुद्धी घामाद्वारे बाहेर पडते आणि चयापचय क्रिया सुरळीत राहते. त्याच्या वर्कआउटमध्ये कार्डिओपासून वेट ट्रेनिंगपर्यंत सर्व प्रकारचा व्यायाम असतो.
4) डाएट प्लॅन
एकेकाळी बटर चिकन आणि छोले भटुरेवर मनापासून प्रेम करणारा विराट कोहली, आता फिटनेसच्या दृष्टीने वनस्पती-आधारित आहारावर भर देतो. त्याच्या आहारात ओट्स, बदाम, नट्स यांसारखे पोषक घटक असतात. तो फळं, भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर लक्ष केंद्रित करतो. आहारात बदल केल्यानंतर त्याच्या फिटनेसला वेगळीच धार आली आहे.
५) योगा
फिटनेस म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे असते, हे विराट जाणतो. त्यामुळे तो दररोज योगा करतो. योगादरम्यान तो प्राणायाम आणि खोल श्वासोच्छवास करतो. यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहते. योगामुळे त्याला दिवसभर ताजेतवाने वाटते.
विराट कोहलीच्या फिटनेसच्या मागे केवळ जिम किंवा व्यायाम नाही, तर सकाळपासून सुरुवात होणारी शिस्तबद्ध जीवनशैली आहे. जर तुम्हीही विराटसारखे फिट राहायचे ठरवलं, तर त्याच्या या सवयी अंगिकारण्याचा प्रयत्न जरूर करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.