Rahul Gandhi Flying Kisses Video  Dainik Gomantak
देश

Viral Video : राहुल गांधी जेव्हा मोदींसाठी ‘फ्लाइंग किस’ देतात! काय आहे प्रकरण एकदा व्हिडिओ पाहाच

Bharat Jodo Yatra Viral Video : जे लोक ‘मोदी, मोदी’ अशी घोषणाबाजी करत होते त्यांच्याकडे पाहून राहुल गांधींनी फ्लाइंग किस दिले.

दैनिक गोमन्तक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये सुरू आहे. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी ‘मोदी, मोदी’च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी राहुल गांधींनी जे केले त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. जे लोक ‘मोदी, मोदी’ अशी घोषणाबाजी करत होते त्यांच्याकडे पाहून राहुल गांधींनी फ्लाइंग किस दिले. यावेळचा व्हिडिओ सोशल मिडियावर आता तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या ‘फ्लाइंग किस’ने गर्दीला चकित केले. (Rahul Gandhi Viral Video)

राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी आपल्या यात्रेला सुरुवात केली आणि मोर्चाची झलक पाहण्यासाठी भाजपच्या झालवार कार्यालयाच्या छतावर जमलेल्या लोकांना त्यांनी फ्लाइंग किस दिले. सोमवारी (5 डिसेंबर) रात्री गांधी थांबलेल्या खेल संकुल येथून यात्रा पुन्हा सुरू झाली आणि सकाळी झालवारमधून पुढे गेली. या व्हिडिओने नेटिझन्समध्ये दोन गट पडले असून या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

'रोहिणी आनंद' या युजरनेमने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. "@RahulGandhi "मोदी! मोदी! घोषणाबाजी करण्याऱ्या लोकांना फ्लाइंग किस देत आहेत. लोक "राहुल गांधी" असे ओरडले तर मोदीही तशीच प्रतिक्रिया देतील का ??" असे कॅप्शन व्हिडिओखाली देण्यात आले आहे.

इथे व्हिडिओ पाहा :

सुमारे 12 किमी अंतर कापल्यानंतर ही यात्रा सकाळी 10 वाजता देवरीघाटावर पोहोचणार आहे. दुपारच्या जेवणानंतर ती सुकेत येथून दुपारी साडेतीन वाजता पुन्हा सुरू होईल. येथील मोरू कलान खेल मैदानावर रात्री मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

SCROLL FOR NEXT