Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: पठ्ठ्यानं लाथ मारताच ATM मधून पडला पैशांचा पाऊस, नंतर काय झालं? तुम्हीच पाहा व्हिडिओ

Viral ATM Video: सोशल मीडियावर दररोज व्हिडिओ, रिल्स, पोस्ट व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

Manish Jadhav

Viral ATM Video: सोशल मीडियावर दररोज व्हिडिओ, रिल्स, पोस्ट व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने एटीएमला लाथ मारताच एटीएममधून नोटांचा पाऊस पडला. त्यानंतर तो नोटांचे बंडल घेऊन तिथून पसार झाला.

आधी हा व्हिडिओ पाहा!

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एटीएम (ATM) मशीनजवळ येत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर तो मशीनला जोरात लाथ मारतो आणि दुसऱ्याच क्षणी एटीएममधून पैशांचा पाऊस पडू लागतो. पैसे हवेत उडू लागतात आणि रस्त्यावर विखुरु लागतात. तो व्यक्ती पटकन पैसे गोळा करु लागतो. त्याचवेळी, एक पोलिस त्याला पाहतो आणि त्याचा पाठलाग करतो. त्यानंतर तो शक्य तितक्या नोटा घेऊन तिथून पळून जातो.

तुम्ही आता पाहिलेला व्हिडिओ @HumansNoContext नावाच्या अकाउंटवरुन X या सोशल साइटवर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत सुमारे 1 कोटी लोकांनी तो पाहिला असून 45 हजार लोकांनी तो लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करुन आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तर अनेकांनी या व्हिडिओला स्क्रिप्टेड म्हटले आहे. त्याचवेळी अनेकांचा असा विश्वास आहे की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Midea) लाईक्स आणि व्ह्यूजसाठी बनवण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, "हे मनी हाइस्टचे देसी व्हर्जन दिसते." त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले की, "आपण अशी लॉटरी का जिंकत नाही?"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "विधानसभेत आमचे प्रश्न ऐकले नाहीत तर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करणार", विजय सरदेसाईंचा सरकारला इशारा

Goa Health Department: राज्यातील आरोग्य व्यवस्था होणार बळकट; डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका भरतीस सरकारची मान्यता

Aggressive Dogs Ban: राज्यात हिंस्र कुत्र्यांच्या जातींवर बंदी; रॉटविलर, पीटबुल बाळगल्यास कारवाई होणार, CM सावंतांची माहिती

Guru Purnima 2025 Wishes: जो अंधारातही वाट दाखवतो… गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुंना पाठवा 'या' खास शुभेच्छा

INS Nistar: पाणबुडींना साह्य करणारी 'निस्तार' नौदलात दाखल, लवकरच येणार 'आयएनएस निपुण'

SCROLL FOR NEXT