Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: लग्नाआधीच नको ते चाळे, 11 सेकंदाचा व्हिडिओ पाहून चक्रावून जाल, लोकांनी कपाळावर मारला हात

Viral Video News: सध्याच्या काळात लग्न ठरले की सर्वात आधी चर्चा होते ती म्हणजे 'प्री-वेडिंग' फोटोशूटची.

Sameer Amunekar

सध्याच्या काळात लग्न ठरले की सर्वात आधी चर्चा होते ती म्हणजे 'प्री-वेडिंग' फोटोशूटची. लग्न अविस्मरणीय करण्यासाठी तरुण जोडपी लाखो रुपये खर्च करून नवनवीन लोकेशन्स आणि हटके थीम्स निवडतात. मात्र, सोशल मीडियावर सध्या एका अशा प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून रोमान्स तर दूरच, पण पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या व्हिडिओमधील विचित्र संकल्पना पाहून नेटकरी विचारत आहेत की, "भावा, हे नक्की फोटोशूट आहे की आत्महत्येचा सराव?"

पाण्यावर तरंगणारे जोडपे

व्हायरल झालेल्या या अवघ्या ११ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एक जोडपे पाण्यावर अशा पद्धतीने पडलेले दिसत आहे की, पहिल्या नजरेत ते जिवंत आहेत असे वाटतच नाही. दोघेही अतिशय स्थिर असून पाण्यावर तरंगत आहेत. कॅमेऱ्याचा अँगल आणि दोघांचे पोझ देण्याची पद्धत इतकी भयानक आहे की, जर तिथे कॅमेरामन किंवा शूटिंगचे इतर साहित्य नसते, तर एखादा अनोळखी व्यक्ती त्यांना पाहून नक्कीच पोलीस स्टेशनला फोन लावला असता. हे शूट पाहून अनेकांनी "अति तिथे माती" या म्हणीची आठवण काढली आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

एक्स (ट्विटर) वर @rose_k01 नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला असून, "प्री-वेडिंग शूट्स आता खूपच विचित्र होत चालले आहेत," असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाख १७ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर येणाऱ्या कमेंट्स तर अधिकच मजेशीर आणि बोचऱ्या आहेत. एका युजरने संताप व्यक्त करत विचारले आहे की, "हे प्री-वेडिंग शूट आहे की 'क्राइम पेट्रोल'च्या पुढच्या भागाचे शूटिंग?", तर दुसऱ्याने उपरोधिकपणे म्हटले आहे की, "हे दोघे लग्नानंतरच्या आयुष्याची भीती दाखवत आहेत की काय?"

हटके करण्याच्या नादात सुरक्षेशी तडजोड?

आजकाल सोशल मीडियावर 'व्ह्यूज' आणि 'लाईक्स' मिळवण्यासाठी अनेक जोडपी जीवघेणे स्टंट किंवा अशा विचित्र थीम्स निवडत आहेत. केवळ वेगळे दिसण्यासाठी केलेल्या अशा प्रयोगांमुळे अनेकदा हसे तर होतेच, पण अशा प्रकारे पाण्यात तासनतास पडून राहणे आरोग्यासाठी किंवा सुरक्षेसाठी घातक ठरू शकते. नेटकऱ्यांनी या जोडप्याला आणि त्यांच्या फोटोग्राफरला चांगलेच धारेवर धरले असून, कलेच्या नावाखाली चाललेला हा मूर्खपणा थांबवावा, असा सूर उमटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT