Vidya Balan Dainik Gomantak
देश

Vidya Balan: 'तुझं नाक खूप मोठं आहे, सर्जरी कर...'; बॉलिवूड दिग्दर्शकाने विद्या बालनला का दिला होता सल्ला? स्वत:च केला मोठा खुलासा

Vidya Balan Nose Surgery: हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री विद्या बालन हिने नुकतीच तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील एक आठवण शेअर केली.

Manish Jadhav

Vidya Balan Interview: हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री विद्या बालन हिने नुकतीच तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील एक आठवण शेअर केली. ‘परिणीता’ या तिच्या पहिल्याच चित्रपटाच्या वेळी निर्माता विधु विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांनी तिला प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) करण्याचा सल्ला दिला होता, असे तिने एका मुलाखतीत सांगितले.

काय घडले होते?

फिल्मफेअर (Filmfare) मासिकाला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनने (Vidya Balan) सांगितले की, ‘परिणीता’ (Parineeta) या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी विधु विनोद चोप्रा तिला म्हणाले होते की, “तुझं नाक खूप मोठं आहे, आपण सर्जरी करुन घेऊ.” हे ऐकून ती खूप घाबरली होती.

तिने पुढे सांगितले की, “मी खूप घाबरले होते. त्यावर मी ठरवले की मी हे काही करणार नाही. आजपर्यंत मी माझ्या चेहऱ्यावर कधीही अशाप्रकारची सर्जरी केलेली नाही. मी फक्त कधीतरी फेशिअल करते. पण मला खात्री आहे की, देवाने मला जसे बनवले आहे, तशात मी खूप खूश आहे.”

नाव बदलण्यासही दिला होता नकार

याआधी, ‘परिणीता’च्या आधी विद्या एका मल्याळम चित्रपटात काम करत होती. त्यावेळी निर्मात्यांनी तिला तिचे आडनाव (Surname) बदलण्यास सांगितले होते, जे तिला मान्य नव्हते. ती म्हणाली, “त्यांनी मला सांगितले की, ‘मंजू वॉरियर, संयुक्ता वर्मा’ यांच्यासारखी तू ‘विद्या अय्यर’ नाव ठेव. तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला सांगितले की, ‘तू विद्या बालनच राहणार आहे’. पण नंतर तो चित्रपटच झाला नाही.”

या अनुभवावरुन विद्याला खात्री झाली की, जर एखादी गोष्ट आपल्याला मनातून पटत नसेल, तर ती कधीही यशस्वी होणार नाही. त्यामुळे जेव्हा चोप्रा यांनी सर्जरीचा सल्ला दिला, तेव्हा ती खूप घाबरली आणि लगेच दिग्दर्शक प्रदीप सरकार यांच्याकडे गेली.

‘प्रदीप सरकार’ यांचा विश्वास

प्रदीप सरकार यांना विद्याच्या प्रतिभेवर खूप विश्वास होता. विद्याने त्यांना याबद्दल सांगितले, तेव्हा ते तिला म्हणाले, “तू काळजी करु नकोस, मी हे सांभाळून घेईन.”

गेल्या महिन्यात ‘परिणीता’ चित्रपटाला (Movie) 20 वर्षे पूर्ण झाली, ज्यामुळे विद्याच्या यशस्वी कारकिर्दीला दोन दशके पूर्ण झाली. सध्या ती ‘भूल भुलैया 3’ (Bhool Bhulaiyaa 3) या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

SCROLL FOR NEXT