BJP leader Kailash Vijayvargiya Dainik Gomantak
देश

Video: 'परदेशात मुली जशा बॉयफ्रेंड बदलतात तसं नितीश कुमार...': BJP नेते विजयवर्गीय

BJP leader Kailash Vijayvargiya: बिहारमध्ये भाजपपासून फारकत घेऊन नितीश कुमार यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासमेवत नवे सरकार स्थापन केले आहे.

दैनिक गोमन्तक

BJP leader Kailash Vijayvargiya: बिहारमध्ये भाजपपासून फारकत घेऊन नितीश कुमार यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासमेवत नवे सरकार स्थापन केले आहे. सरकार स्थापनेवरुन आता भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी नितीश कुमार यांची खिल्ली उडवली आहे. बिहारमध्ये नवे सरकार स्थापन होत होते तेव्हा आपण परदेशात असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशात असताना मला एकाने सांगितले की, 'इथे मुली पटकन बॉयफ्रेंड बदलतात. बिहारमध्ये नितीशकुमारांचीही तीच स्थिती आहे.'

दरम्यान, बिहारमध्ये नितीशकुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आठ दिवस उलटले आहेत, मात्र भाजप (BJP) नेत्यांकडून नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल सुरुच आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबतची साथ सोडून तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या राजद आणि काँग्रेससोबत बिहारमध्ये नवे सरकार स्थापन केले. दुसरीकडे, बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगलराजचा दावा करणाऱ्या विजयवर्गीय यांनी नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्यावर मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन आता बिहारच्या राजकारणात भूकंप आला आहे.

न्यूज एजन्सी एएनआयनुसार, विजयवर्गीय म्हणाले, "ज्या दिवशी बिहारमध्ये सत्तापालट झाला, त्या दिवशी मी परदेशात होतो, त्यावेळी मला एकाने सांगितले की, आमच्या बाबतीत असेच होते, मुली केव्हाही बॉयफ्रेंड बदलतात. बिहारमध्ये (Bihar) नितीशकुमारांचीही तीच स्थिती आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT