video viral molestation girls insolence police search miscreants sexually harassed and assaulted horrifying alirajpur madhya pradesh Dainik Gomantak
देश

मुलींसोबत अश्लील वर्तन, व्हिडिओ व्हायरल

एका तरुणाने हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केलाय

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिथे काही मुलींचा विनयभंग आणि त्यांच्यासोबत अश्लील कृत्ये करण्यात आली. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ही घटना वालपूर गावची आहे. मुली भगोरिया जत्रा पाहण्यासाठी गेल्या असताना ही घटना घडली. व्हिडिओच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यासोबतच हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचीही पोलिसांनी चौकशी केली. याप्रकरणी एसपी अलीराजपूर यांनी स्वत: वालपूर गावात पोहोचून तपास सुरू केला.

आरोपींना लवकरात लवकर अटक करू असा दावाही एसपींनी केला. शुक्रवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह व्हिडिओ (video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही अनोळखी तरुण जत्रेत मुलींसोबत खुलेआम अश्लील कृत्य करत आहेत. हा व्हिडिओ धार येथील रहिवासी तरुणाने बनवला असून अलीराजपूर येथील एका तरुणाने हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

दोन्ही तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. या घटनेबाबत आदिवासी समाजात संताप व्यक्त होत असून आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी त्यांनी पोलिसांना (police) निवेदनही दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांची धावाधाव

Goa Assembly Session: 'अर्थसंकल्प आकड्यांचा खेळ नसून राज्याचे आर्थिक नियोजन'! CM सावंतांनी ठणकावले; काल विधानसभेत काय घडले? वाचा..

Panaji Municipal Elelction: पणजी महानगरपालिकेवर कुणाची सत्ता? निर्णय होणार मतपेटीत बंदिस्त; 48 केंद्रांवर यंत्रणा सज्ज

Rashi Bhavishya: जय हो! चांगली बातमी कानावर पडणार; या राशींसाठी महत्वाचा काळ सुरु

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT