Pamei Twitter/ @BiswajitThongam
देश

वेड्या बहिणीची वेडीही माया; 10 वर्षांच्या मुलीचा शाळेतील व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) एका चिमुरडीचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती झोपलेल्या लहान बहिणीला मांडीवर घेऊन वर्गात बसलेली आहे.

दैनिक गोमन्तक

सोशल मीडियावर (Social Media) एका चिमुरडीचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती झोपलेल्या लहान बहिणीला मांडीवर घेऊन वर्गात बसलेली दिसत आहे. दरम्यान, मणिपूरचे (Manipur) ऊर्जा आणि वनमंत्री बिस्वजित थोंगम यांनी या चिमुकलीच्या फोटोची तात्काळ दखल ट्विटरवर पोस्ट लिहीली. ज्यावर यूजर्स मजेदार कमेंट करु लागले आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोत, मणिपूरमधील तामेंगलाँग येथील मेनिंग्सिन्लिउ पामेई नावाची 10 वर्षांची मुलगी तिच्या बहिणीला सोबत घेऊन शाळेत जात आहे. कारण, तिचे आई-वडील शेतात जातात आणि मीनिंग्सिन्लिउ तिच्या धाकट्या बहिणीसोबत अभ्यास करते. चिमुरडीने दाखवलेले समर्पण आणि प्रेम पाहून बिस्वजित थोंगम थक्क झाले. मंत्रीमहोदयांनी लगेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन फोटो शेअर केला. (Video Viral 10 year old girl was sitting in class with younger sister in her lap, people get emotional)

दरम्यान, पोस्ट सोबतच्या कॅप्शनमध्ये मंत्रिमहोदयांनी लिहिले आहे की, "शिक्षणासाठीच्या तिच्या समर्पणाने मला चकित केले! तामेंगलाँग, मणिपूरमधील मिनिंग्सिन्लिउ पामेई नावाची ही 10 वर्षांची मुलगी तिच्या बहिणीची काळजी घेत असताना शाळेत जाते कारण तिचे आईवडील शेतात जातात.”

दुसरीकडे, फोटो पाहिल्यानंतर लोक भावूक झाले आणि पोस्टवर कमेंट करु लागले. एका यूजर्सने लिहिले, "कौतुक!! या धाडसी मुलीला सलाम... ती आपल्या शिक्षणाला जास्त महत्त्व देते," दुसऱ्या यूजर्सने म्हटले की, "एक हजार शब्दांचा फोटो."

तसेच, बिस्वजित थोंगम यांनी म्हटले की, 'मी कुटुंबाशी संपर्क साधू शकलो आणि त्यांना मीनिंग्सिन्लियूला इंफाळला आणण्यास सांगितले.' तसेच या चिमुरडीच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची (Education) काळजी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवाय, त्यांनी पोस्टमध्ये लिहिले. “मी सोशल मीडियावर ही बातमी वाचली. आम्ही लगेच या मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेतला आणि त्यांना इंफाळला आणण्यास सांगितले. ती पदवीधर होईपर्यंत मी स्वतः तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार आहे. मी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तिच्या समर्पणाबद्दल मला अभिमान आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Katrina Kaif Baby Boy: आई-बाबा झाले कतरिना कैफ- विकी कौशल! लग्नाच्या 4 वर्षांनी चिमुकल्याचे आगमन, PHOTO पोस्ट करत दिली माहिती

BJP X INC Goa: काँग्रेस विद्यार्थी संघटनेने दामू नाईकांसाठी बुक केली मानसोपचारतज्ज्ञांची अपॉइंटमेंट

Ranji Trophy 2025: रजत पाटीदारला रोखण्यासाठी 'मास्टरप्लॅन'! गोवा संघात खास गोलंदाजाची एन्ट्री, फलंदाजाची धाकधूक वाढली

Goa Today's News Live: साळगाव खून प्रकरण; संशयितांना लवकरच अटक केली जाईल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Water Metro Goa: ‘वॉटर मेट्रो’साठी पुढचे पाऊल! अभ्यास पथकाची 28 ठिकाणी भेट; अहवाल पाठवणार पुढे

SCROLL FOR NEXT