Uttar Pradesh Crime News Dainik Gomantak
देश

VIDEO: वकिलांकडून पोलिस इन्स्पेक्टरला मारहाण; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये बुधवारी वकिलांनी कलक्ट्रेट पोलिस चौकीचे प्रभारी निरीक्षक दुर्गेश सिंह यांना मारहाण केली.

Manish Jadhav

VIDEO: उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये बुधवारी वकिलांनी कलक्ट्रेट पोलिस चौकीचे प्रभारी निरीक्षक दुर्गेश सिंह यांना मारहाण केली. इन्स्पेक्टर सिंह यांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा पाठलाग करुन मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना एसपी कार्यालयासमोर तहसील कार्यालयाच्या गेटजवळ घडली. इन्स्पेक्टर आणि वकील यांच्यात जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. अचानकपणे इन्स्पेक्टरला झालेल्या मारहाणीमुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे. एका कॉन्स्टेबलने इन्स्पेक्टर सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्नही केला पण तोपर्यंत वकिलांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. दरम्यान, अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एसपी सोमेंद्र मीणा यांनी यासंदर्भात बार अधिकाऱ्यांशी बोलून पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.

दरम्यान, 22 जानेवारी रोजी एका वकिलावर जमिनीच्या वादात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी इन्स्पेक्टरने शांतता भंगाच्या कलमांतर्गत कारवाई केली होती. याच प्रकरणी वकिलाने इन्स्पेक्टरची चौकशी केली असता त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी वकिलांचे पथक एसपीकडे गेले होते. वकिलांनी एसपींना सांगितले की, कलक्ट्रेट चौकी पोलिसांनी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातच ते कलक्ट्रेट कार्यालयात पोहोचले असता त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले. वकिलांनी चौकीत वकिलाला मारहाण केल्याचा आरोपही केला. एसपींनी याप्रकरणी दोन तासांत कारवाईचे आश्वासन दिले होते.

दरम्यान, कलक्ट्रेट कार्यालय चौकीचे प्रभारी दुर्गेश सिंह पायी एसपी कार्यालयाकडे जाताना दिसताच वकिलांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दरम्यान त्यांच्यात बाचाबाचीही सुरु झाली. वकिलांनी इन्स्पेक्टर सिंह यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावर वकिलांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना खाली पाडले आणि मारहाण केली. चौकी प्रभारीला मारहाण होत असल्याचे पाहून पोलीस कार्यालय आणि कलक्ट्रेट चौकीतील हवालदारांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना घेराव घालून सिंह यांना वाचवले. त्याचवेळी, एसपींनी याप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT