video Khalistan flags found tied on the main gate and boundary wall of the Himachal Pradesh Legislative Assembly  ANI
देश

हिमाचल विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे, व्हिडिओ व्हायरल

विधानसभेच्या भिंतींवरही खलिस्तान लिहिण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

हिमाचलच्या धर्मशाळेत विधानसभेच्या इमारतीबाहेर खलिस्तानी झेंडे (Khalistan flags) दिसल्याने खळबळ उडाली आहे. या झेंड्यांवर खलिस्तान लिहिले होते. ही बाब उघडकीस आल्यानंतर योल पोलिसांनी त्यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, येथील स्थानिक लोकांनी सकाळी विधानसभेच्या मुख्य गेटवर काळे झेंडे दाखवल्याची माहिती दिली. या घटनेचा पोलीस सखोल तपास करत आहेत. (Khalistan flags found Himachal Pradesh Legislative Assembly)

धर्मशाळा तपोवन येथील विधानसभा इमारतीचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विधानसभा इमारतीच्या बाहेरील गेटचा आहे जिथे खलिस्तानी झेंडे दिसत आहेत. हा व्हिडिओ 12 सेकंदांचा आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धर्मशाळेत खळबळ उडाली आहे. हे झेंडे कोणी लावले याचा तपास सुरू आहे. दुसरीकडे या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीएम शिल्पी वेक्टाही घटनास्थळी पोहोचले. विधानसभेच्या भिंतींवरही खलिस्तान लिहिण्यात आले आहे. हे झेंडे येथे कोणी लावले हे अद्याप समजू शकलेले नाही. हे झेंडे कोणी आणि का लावले याचा शोध घेण्यासाठी सध्या पोलीस स्थानिक लोकांची चौकशी करत आहेत.

हिमाचलमध्ये सुरक्षा वाढवण्यातआली

हिमाचल प्रदेशच्या शेजारील राज्यांमध्ये दहशतवादाच्या मॉड्यूल्सना अटक करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता हिमाचल सरकारने देखील सतर्कता आणि सुरक्षा वाढवली होती. असे असतानाही अशा घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले होते की, शेजारील राज्यांमध्ये दहशतवादी मॉड्यूल सतत सक्रिय होणे आणि जड शस्त्रांसह पकडले जाणे चिंताजनक आहे. हिमाचलनेही खबरदारीच्या सुरक्षेबाबत पाळत ठेवली आहे. हिमाचलच्या सीमेवर अतिरिक्त पहारा असणार आहे.

ठाकूर म्हणाले होते की, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये अशी गुन्हेगारी प्रतिमा आणि दहशतवादी संघटनांशी संबंधित लोकांना अटक करणे हे सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेचे परिणाम आहे. मात्र शेजारील राज्यांतील घटना पाहता हिमाचल प्रदेशनेही तयारी करणे गरजेचे आहे. या संदर्भात सुरक्षा यंत्रणा, पोलिसांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अशा गुन्हेगारांवर सतत नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT