Munawwar Farooqui Dainik Gomantak
देश

'मुनव्वर फारुकीचा शो रद्द करा नाही तर...', VHP चा दिल्ली पोलिसांना इशारा

Munawwar Farooqui: विश्व हिंदू परिषदेने (VHP) दिल्ली पोलिसांना पत्र लिहून मुनव्वर फारुकीचा 28 ऑगस्ट रोजी दिल्लीत होणारा शो रद्द करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Vishwa Hindu Parishad: विश्व हिंदू परिषदेने (VHP) दिल्ली पोलिसांना पत्र लिहून मुनव्वर फारुकीचा 28 ऑगस्ट रोजी दिल्लीत होणारा शो रद्द करण्याची मागणी केली आहे. हिंदू संघटनेने पुढे म्हटले आहे की, 'फारुकीचा शो रद्द न केल्यास विहिंप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन करतील. मुनव्वर फारुकीचा शो 28 ऑगस्ट रोजी दिल्लीतील सिविक सेंटरमध्ये होणार आहे. याबाबत विहिंपने दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.'

दरम्यान, VHP ने आपल्या पत्रात लिहिले आहे की, "मुनव्वर फारुकी (Munawwar Farooqui) नावाचा कलाकार 28 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या सिविक सेंटरमधील केदारनाथ स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करत आहे. भाग्य नगर (Hyderabad) मध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता."

दुसरीकडे, या पत्रात असे म्हटले आहे की, "मी तुम्हाला विनंती करतो की, हा शो तात्काळ रद्द करा, अन्यथा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते या शोचा निषेध करतील. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की, तो तात्काळ थांबवा. कृपया योग्य कारवाई करा आणि त्याबद्दल माहिती द्या."

तसेच, हैदराबादमध्ये (Hyderabad) स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या 50 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, त्याचा कार्यक्रम शांततेत पार पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT