Uttarakhand High Court Dainik Gomantak
देश

Uttarakhand HC ने फेसबुकला ठोठावला 50,000 रुपयांचा दंड, 'अश्लील व्हिडिओ...'

Uttarakhand High Court: सरन्यायाधीश विपिन सांघी आणि न्यायमूर्ती आर सी खुल्बे यांच्या खंडपीठाने फेसबुकला 16 फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

Uttarakhand High Court: फोटो एडिट करुन अश्लील व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर अपलोड करणे आणि पैसे न दिल्यास ते कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देणे या प्रकरणी उत्तराखंड उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी केली. जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान उत्तर सादर न केल्यामुळे फेसबुकला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सरन्यायाधीश विपिन सांघी आणि न्यायमूर्ती आर सी खुल्बे यांच्या खंडपीठाने फेसबुकला 16 फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

या प्रकरणानुसार, हरिद्वारचे रहिवासी आलोक कुमार यांनी जनहित याचिका दाखल केली असून या प्रकरणात आपण स्वत: पीडित असल्याचे म्हटले आहे. वकील अभिजय नेगी यांनी याचिकेद्वारे न्यायालयाला सांगितले की, 'फेसबुकवर (Facebook) लोकांचे बनावट आयडी तयार करुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जात आहे. काही वेळाने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांचा फोटो एडिट करुन अश्लील व्हिडिओ बनवला जात आहेत.'

आयडी ब्लॉक करण्याची विनंती केली

असाच एक व्हिडिओ याचिकाकर्त्यालाही पाठवण्यात आला होता. याबाबत त्यांनी एसएसपी हरिद्वार, डीजीपी आणि गृह सचिव यांच्याकडे तक्रार केली असता त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी आरटीआयमध्ये पोलीस (Police) विभागाला विचारले की, 'उत्तराखंडमध्ये आतापर्यंत अशा किती प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 45 पीडितांनी तक्रार केल्याचे त्यांना सांगण्यात आले. हे प्रकरण अद्याप विचाराधीन आहे.'

दुसरीकडे, अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या लोकांचे आयडी ब्लॉक करण्याच्या सूचना फेसबुकला देण्यात याव्यात, अशी याचिका याचिकाकर्त्याने जनहित याचिकेमध्ये केली आहे. फेसबुक, एसएसपी आणि डीपीजी यांना एक क्रमांक जारी करण्याच्या सूचना द्याव्यात, ज्यामध्ये पीडित त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT