Uttar Pradesh Woman leaves 4th husband and 3 children for fifth lover. Dainik Gomantak
देश

प्रियकरासाठी नवऱ्यासह 3 चिमुकल्यांना सोडले, बायकोच्या शोधात चौथ्या पतीची वणवण

पती आणि तीन मुलांच्या बापाने अशीही माहिती दिली की त्याच्याशी लग्न करण्यापूर्वीच पत्नीने तीनदा लग्न केले होते. आणि आता आरोप केला की तिने आपल्या प्रियकरासाठी त्याला आणि तीन मुलांना सोडून दिले आहे.

Ashutosh Masgaunde

Uttar Pradesh Woman leaves 4th husband and 3 children for fifth lover :

उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आरोप केला आहे की, त्याची पत्नी त्याच्या तीन मुलांसह त्याला सोडून, प्रियकरासह पळून गेली आहे.

पतीने अशीही माहिती दिली की पत्नीशी लग्न करण्यापूर्वी तिचे तीनदा लग्न झाले होते. आता पती आरोप करत आहे की, आपल्या 'पाचव्या' प्रियकरासाठी पत्नीने त्याला आणि तीन मुलांना सोडून दिले आहे.

या सर्व प्रकारानंतर हा पीडित तरुण पत्नीच्या शोधात गोवोगावी सूचना फलक घेऊन वणवण फिरतोय. त्याच्या हातात असलेल्या या फलकावर 'बेपत्ता व्यक्तीचा शोध' असे लिहिलेला मजकूर पत्नीचा फोटो आहे.

अनिल राजभर नावाच्या या तरुणाने या घटनेनंतर प्रशासनाकडे मदत मागितली आहे. त्याच्या लग्नाची ही ऐकल्यानंतर प्रत्येकजण डोक्याला हात लावत आहे. या अनिलला त्याची पत्नी रीना चंदीगड, पंजाब येथे भेटली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केले होते.

तरुणाने दावा केला की तो दहा वर्षांपूर्वी चंदीगडमध्ये रीनाला भेटला होता. त्यानंतर ते मित्र बनले होते. पुढे, मैत्री नात्यात फुलली आणि अनिल आणि रीनाने चंदीगडमध्ये लग्न केले.

लग्नानंतर अनिल आपल्या पत्नीसह त्याच्या गावी गेला आणि उत्तर प्रदेशातील आझमगड येथे स्थायिक झाला. त्यांने पोलिसांना सांगितले की ते नऊ वर्षांपासून एकत्र असून त्यांना तीन मुले आहेत. तो म्हणाला की त्यांच्यात सर्व काही ठीक होते, परंतु ती सतत कोणाशीतरी फोनवर बोलायची. शेवटी तीने प्रियकराच्या साथीने पळ काढला.

अनिलने पोलिसांना सांगितले की, रीना ३ जुलै रोजी प्रियकरासह पळून गेली. त्यांनी पोलिसांची मदत मागितली. मात्र, अद्यापपर्यंत या महिलेचा शोध लावण्यात पोलिसांनाही अपयश आले आहे, असे वृत्तात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gautam Gambhir: गौतम गंभीरची हकालपट्टी होणार का? BCCI सचिवांनी दिलं थेट उत्तर; म्हणाले 'त्यांना काढून टाकण्याची बातमीच...'

Ponda Accident: फोंड्यात वातावरण पेटले! डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखली, ट्रकची केली नासधूस

Cigarette Price Hike: सिगारेट ओढणाऱ्यांसाठी चटका देणारी बातमी! 4 पटीने वाढणार किंमत; धूम्रपान करणाऱ्यांना सरकारचा मोठा धक्का

Rohit Sharma Viral Photo: 'मी रोहित शर्मासारखा दिसतोय हे ऐकून.. ', हिटमॅनसारख्या दिसणाऱ्या खेळाडूने जिंकले फॅन्सचे हृदय; पहा Video

Goa Dhirio: कोलवामध्ये पुन्हा 'धिरिओ'चा थरार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्राणीमित्रांकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT