Crime News  Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: ‘’आधी बायकोची हातोड्याने हत्या नंतर आईवर गोळी झाडली, अन्...’’; उत्तर प्रदेशातील मन सुन्न करणारी घटना

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील सीतापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 45 वर्षीय व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील सीतापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 45 वर्षीय व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. यानंतर त्यानेही आपले जीवन संपवले. सीतापूर येथील अनुराग सिंह याने केलेल्या हत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या भीषण घटनेचे वृत्त समजताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. एवढं भयंकर पाऊल उचलण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असं काय घडलं असेल, असा विचार स्थानिक लोकांना करायला या घटनेनं भाग पाडलं.

दरम्यान, आरोपी अनुराग सिंहने सर्वप्रथम पत्नी प्रियांका सिंह (40 वर्षे) यांची हत्या केली. नंतर आई सावित्री देवी (62 वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर मोठी मुलगी अश्वी सिंह (12 वर्षे), मुलगा अनुराग आणि धाकटी मुलगी अर्ना (8 वर्षे) यांची हत्या केली. आरोपी अनुरागने पत्नीला मारण्यासाठी हातोडीचा वापर केला, तर मुलांना घराच्या टेरेसवरुन खाली ढकलले.

मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाल्हापूर गावात ही घटना घडली

मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाल्हापूर गावात ही घटना घडली. पोलिसांच्या प्राथमिक रिपोर्टनुसार, अनुरागला अंमली पदार्थांचे व्यसन होते आणि तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थही होता. या घटनेबाबत सीतापूरचे एसएसपी चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की, आज मथुरा येथील रामपूर पोलिसांना अनुराग सिंह (वय-45 वर्षे) नावाच्या एका मानसिक रुग्णाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कुटुंबातील 5 जणांची हत्या केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT