UP mahant Bajrang Muni  Dainik Gomantak
देश

मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी देणारा महंत बजरंग मुनी गजाआड

मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी देणारा महंत बजरंग मुनीला अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Sitapur Hate Speech Case: सीतापूर जिल्ह्यात मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी देणारा महंत बजरंग मुनीला यूपीमध्ये अटक करण्यात आली आहे. यूपी पोलिसांनी सीतापूरमध्ये महंतला अटक केली. यूपी पोलिसांनी (Police) या प्रकरणी सहा दिवसांपूर्वी एफआयआर नोंदवला होता. महंत यांच्या द्वेषपूर्ण भाषणाचा व्हिडिओ व्हायरलं झाल्यानंतर नागरिकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. लोकांच्या नाराजीनंतर ही एफआयआर नोंदवण्यात आली. विशेष म्हणजे यूपीच्या सीतापूरमध्ये महंतांनी दिलेल्या द्वेषपूर्ण भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महंताने सीतापूर जिल्ह्यातील एका मशिदीबाहेर एका सभेला संबोधित करताना मुस्लिम महिलांचे (Women) अपहरण आणि बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप आहे. मुस्लीम भागातील मुलीचा कोणी छळ केला तर मुस्लिम महिलांचे अपहरण करुन सार्वजनिक ठिकाणी बलात्कार करु, असं महतांने म्हटलं होतं. द्वेषपूर्ण भाषणाच्या या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारीही दिसत होता.

तसेच, खैराबाद शहरातील महर्षी श्री लक्ष्मण दास उदासी आश्रमाचे महंत बजरंग मुनी दास या नावाने ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीने नवरात्री आणि हिंदू नवरात्रोत्सवानिमित्त मिरवणूक काढली तेव्हा द्वेषयुक्त भाषण असलेला दोन मिनिटांचा व्हिडिओ 2 एप्रिल रोजी रेकॉर्ड करण्यात आला होता. मिरवणूक मशिदीजवळ पोहोचली तेव्हा त्याने लाऊडस्पीकरवर द्वेषपूर्ण भाषण देण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT