CRIME Dainik Gomantak
देश

'नातीची Lifestyle आजोबांना खटकली; मती भ्रष्ट झाल्यावर केली हत्या'

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) देवरिया (Deoria) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) देवरिया (Deoria) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. एक किशोरवयीन मुलगी समाजाने घालून दिलेल्या रुढी आणि कौटुंबिक पंरपरेचा बळी ठरली आहे. देवरियामधून हा अत्यंत लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. देवरियामध्ये एका कुटुंबातील अजोबा आणि काकांनी त्यांच्या स्वत:च्याच घरातील 17 वर्षीय किशोरवयीन मुलीची हत्या केली.

सांवरेजी खासग (Savanreji Khasag) गावात राहणारी ही 17 वर्षीय किशोरवयीन मुलीने जीन्स आणि टीशर्ट घातल्याने कुटुंबातील आजोबा आणि काकांनी तिला काठीने मारहाण करत तिचा जीव घेतला. कुटुबांतील सदस्यांची सहमती नसताना तिने ही जीन्स घातली होती. ही मुलगी शिक्षणाला लुधियानामध्ये होती. मात्र आजोबांचा नकार असतानाही नातीने जीन्स आणि इतर वेस्टन ड्रेस घालण्याची हिम्मत केली होती. जेव्हापासून ती गावी परत आली होती तेव्हापासून तिला निळ्या रंगांच्या जीन्स घालायच्या नाहीत म्हणून दबाव आणला जात होता. मात्र मुलीने आजोबांचे काही एक न ऐकता तिने जीन्स घालण्याचे सुरुच ठेवले. मात्र आजोबांनी तिला त्या छोट्याशा कारणावरुन बेदम मारहाण केली आणि त्यामध्येच तिचा मृत्यू झाला.

नातीचा मृतदेह पुलावरुन फेकला पण..

नातीच्या मृत्यूनंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपींनी तिचा मृतदेह कासिया-पटना महामार्गावरील पुलावरुन फेकला. मात्र तिचा मृतदेह पूलाच्या ग्रीलवर अडकला. काही तास हा मृतदेह तसाच त्या ग्रीलवर लटकत होता. त्यानंतर त्या ठिकाणाहून जात असणाऱ्या लोकांनी पोलिसांना संबंधित माहिती दिली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या किशोरवयीन मुलीने लुधियानामध्ये शिक्षणाला असताना जीन्स आणि टॉप घालण्यास सुरुवात केली होती. मात्र ती जेव्हा आईबरोबर आपल्या मूळ गावी आली तेव्हा तिला तिच्या आजोबांनी सलवार आणि सूट घालण्यास जबरदस्ती भाग पाडले. मात्र मुलीने त्यांचे म्हणणे काही एक न ऐकता घराबाहेर अधिक अधिक वेळ घालवायला सुरुवात केली.

आरोपींना अटक

उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आजोबा हे रिक्षाचालक आहेत. या मृत मुलीचे काका अद्याप फरार आहेत. मुलीच्या आईने पोलिसांना कोणत्याही स्वरुपाची माहिती दिलेली नाही. मात्र त्यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने पाश्चात्य कपडे घालण्यास सुरुवात केल्याबद्दल काका आणि आजोबा खूप संतापले होते आणि याआगोदरही तिच्यावर हल्ला करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT