UP Election: Attack on BJP's star campaigner Babita Phogats convoy in Meerut  Dainik Gomantak
देश

भाजपच्या स्टार प्रचारक बबीता फोगाटच्या ताफ्यावर मेरठमध्ये हल्ला

युपीमध्ये नेत्यांवर हल्ला करण्याची हि पहिलीच घटना नाही, तर याआधी 3 फेब्रुवारीला असदुद्दीन ओवेसी यांच्यावर मेरठमध्ये हल्ला झाला होता.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशमध्ये मतदानाची (UP Election 2022) तारीख जवळ येत चालली आहे, तर उमेदवारांच्या समर्थनार्थ मत मागण्यासाठी स्टार प्रचारकांच्या हालचालीही वाढल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी त्यांना विरोधही होत आहे. अशा परिस्थितीत आज (शनिवारी) मेरठमध्ये भाजपच्या स्टार प्रचारक बबिता फोगट यांच्या ताफ्यावर काही लोकांनी हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बबिता फोगट मेरठ जिल्ह्यातील शिवलखास विधानसभा मतदारसंघातील दबथुवा गावात भाजप उमेदवार मनिंदर पाल यांच्या समर्थनार्थ प्रचार करत असताना गोवात फिरत होत्या. त्यानंतर काही लोकांनी लाठ्या-काठ्या आणून त्यांचा विरोध केला. आणि त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

युपीमध्ये नेत्यांवर हल्ला करण्याची हि पहिलीच घटना नाही, तर याआधी 3 फेब्रुवारीला असदुद्दीन ओवेसी यांच्यावर मेरठमध्ये हल्ला झाला होता. ओवेसींच्या गाडीवर चार राऊंड गोळीबार करण्यात आला. मेरठहून परतत असताना आपल्यावर गोळीबार करण्यात आल्याचे ओवेसींनीच सांगितले होते.

आम्ही मेरठहून दिल्लीला निघालो आहोत, हे सर्वांना माहीत आहे. टोल प्लाझाजवळ गाडीचा वेग कमी होतो हे सर्वांनाच माहीत आहे. यादरम्यान हल्लेखोराने आम्हाला लक्ष्य करत आमच्या गाड्यांवर गोळीबार केला, अशी माहिती असदुद्दीन ओवेसी यांनी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT