Bihar Bridge collapses  Dainik Gomantak
देश

Bihar Bridge collapses : बिहारमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला; संपूर्ण घटना Video मध्ये कैद

बिहारमधील भागलपूरमधे बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला

Rajat Sawant

Bihar : बिहारमधील भागलपूरमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला आहे. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून त्यात काही सेकंदात पूल नदीत बुडाला. याआधीही याठिकाणी पूल तुटला होता, म्हणजेच तो पुन्हा बांधला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता पुन्हा एकदा पूल तुटून नदीत बुडाला आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2014 साली पुलाची पायाभरणी केली होती. 1700 कोटी रुपयांचा खर्च करून खगरियाच्या अगुवानी-सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर हा पूल बांधण्यात येत होता. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा पूल अचानक कोसळला.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये आधी पुलाचा काही भाग तुटतो आणि नंतर काही वेळातच संपूर्ण पूल नदीत बुडतो. घटनास्थळी उपस्थित अनेकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या फोनमध्ये कैद केला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या दुर्घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT