Triple Talaq Dainik Gomantak
देश

Types Of Talaq: इस्लाममध्ये तलाकचे किती प्रकार आहेत? हलाला नेमकं काय, वाचा सविस्तर

Talaq In Islam: इस्लाममध्ये पती-पत्नीला अनेक अधिकार देण्यात आले आहेत. यामध्ये जोडप्याला घटस्फोटाचा अधिकारही आहे.

Manish Jadhav

Talaq In Islam: इस्लाममध्ये पती-पत्नीला अनेक अधिकार देण्यात आले आहेत. यामध्ये जोडप्याला घटस्फोटाचा अधिकारही आहे. इस्लाममध्ये तलाकचे तीन प्रकार सांगितले आहेत. इस्लाममध्ये तलाक-ए-हसन, तलाक-ए-अहसान आणि तलाक-ए-बिद्दत म्हणजेच तिहेरी तलाकबद्दल माहिती देण्यात आली आहे. मात्र, आता भारतात तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने (Central Government) तिहेरी तलाकवर कायदा केला आहे. तिहेरी तलाक व्यतिरिक्त इस्लाममध्ये हलालाचाही उल्लेख आहे. घटस्फोटानंतर पती-पत्नीला पुन्हा एकत्र राहायचे असेल, तर हलालाची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. तिहेरी तलाक, त्याचे प्रकार आणि हलाला याविषयी जाणून घेऊया.

इस्लाममध्ये घटस्फोटाचे प्रकार

तलाक-ए-हसन

तलाक-ए-हसन अंतर्गत, पती 3 महिन्यांत पत्नीला घटस्फोट देतो. तो पत्नीला एका महिन्याच्या अंतरानंतर घटस्फोट घेण्यास सांगतो. जेव्हा पती पहिल्यांदा पत्नीला तलाक म्हणतो, तेव्हा पत्नीला मासिक पाळी आलेली नसावी.

त्यानंतर दुसऱ्यांदा तलाकच्या आधी आणि नंतरही दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरुच असतात. त्यानंतरही पती-पत्नीमध्ये समेट होत नसेल तर पती तिसऱ्या महिन्यात तिसरा तलाक देतो. मात्र, या तीन महिन्यांत पती-पत्नीने एकदाही लैंगिक संबंध ठेवले तर त्यांचा घटस्फोट होत नाही.

तलाक-ए-अहसान

तलाक-ए-अहसानमध्ये पती पत्नीला फक्त एकदाच तलाक म्हणतो. यानंतर पुढील तीन महिने पती-पत्नी एकाच छताखाली राहतात. परंतु एकमेकांपासून अंतर ठेवतात. दरम्यान, पतीला घटस्फोटाचा निर्णय बदलायचा असेल तर तो बदलू शकतो. जर त्याने असे केले नाही तर 3 महिने पूर्ण झाल्यावर घटस्फोट होतो.

तलाक-ए-बिद्दत

तलाक-ए-बिद्दत अंतर्गत, पती पत्नीला एकाच वेळी तीनदा तलाक म्हणतो. हा घटस्फोट लगेच होतो. त्याला इंस्टंट तलाक असेही म्हणतात. मात्र, भारतात (India) तिहेरी तलाक बेकायदेशीर आहे. तलाक-ए-हसन आणि तलाक-ए-अहसानवर बंदी घालण्याची मागणी न्यायालयात केली जात आहे.

हलाला म्हणजे काय?

इस्लामच्या तज्ज्ञांच्या मते, जर कोणी आपल्या पत्नीला तलाक देत असेल आणि त्यानंतरही त्याला आपल्या पत्नीशी समेट घडवायचा असेल तर पत्नीला हलालामधून जावे लागते. पत्नीला प्रथम दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करावे लागते.

यानंतर, जेव्हा दुसरा पती घटस्फोट घेतो, तेव्हा ती महिला तिच्या पहिल्या पतीकडे परत येऊ शकते. पती-पत्नीला पुन्हा लग्न करावे लागेल. इस्लामच्या दृष्टीने घटस्फोटानंतर पत्नी पतीसाठी हराम ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT