Two government school teachers sexually harassed more than 15 girl students

 

Dainik Gomantak

देश

तामिळनाडूमध्ये सरकारी शाळेतील शिक्षकांनी 15 हून अधिक विद्यार्थिनींचा केला लैंगिक छळ

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला लाज आणणारी घटना तामिळनाडूतून समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला लाज आणणारी घटना तामिळनाडूतून समोर आली आहे. तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षकावर शालेय विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर कारवाई करत पोलिसांनी शिक्षकाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील (School) 15 विद्यार्थिनींनी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली होती. या सर्व मुली इयत्ता 9वी आणि 10वीच्या होत्या. बालकल्याण विभागाने शाळेत बाल संरक्षणाबाबत जनजागृती मोहीम राबवली असता शिक्षकाचा हा गैरप्रकार उघडकीस आला. या कार्यक्रमानंतर मुलींनी आपली परीक्षा कथन केली.

शाळा संपल्यावर शिक्षक फोन करायचे

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींनी शाळेतील गणित आणि सामाजिक शास्त्र शिकवणाऱ्या दोन शिक्षकांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. विद्यार्थिनींनी सांगितले की, दोन्ही शिक्षक अनेकदा मुलींशी दुहेरी अर्थाने बोलत असत आणि त्यांना अयोग्य स्पर्श करत असत. एवढेच नाही तर शाळा संपल्यानंतर दोन्ही शिक्षक त्यांना फोन करायचे. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सामाजिक शास्त्राच्या शिक्षकाला अटक केली तर दुसरा शिक्षक फरार आहे. पोलिस या गणित शिक्षकाचा शोध घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची चौकशी जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व सर्व महिला ठाणे निरीक्षक करीत आहेत.

तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) लैंगिक छळाची अनेक प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. अलीकडेच, एका प्राध्यापकाने ऑनलाइन क्लासदरम्यान मुलींशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. लैंगिक छळ रोखण्यासाठीचे हे नियम तामिळनाडूमध्ये ऑनलाइन वर्गांसाठी सर्वत्र लागू होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT