Mini Goa Jharkhand drowning  x
देश

Mini Goa: प्रसिद्ध पर्यटनस्थळ मिनी गोवा येथे चार शालेय मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला

Jharkhand Mini Goa: चारजणांपैकी तीनजण शालेय विद्यार्थी असून, एकजण महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

झारखंड: दुमका शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ मिनी गोवा येथे चार शालेय विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. यातील एकाचा मृतदेह सापडला असून, तीनजण अद्याप बेपत्ता आहेत. इतरांचा शोध तपास पथकाकडून घेतला जात आहे. मयुराक्षी नदीच्या किनारी हे मिनी गोवा प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्ण सिंह (१७) या मुलाचा मृतदेह सापडला असून, इतरांचा तपास घेतला जात आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

आर्यन (रा. गोड्डा) आणि कृष (सोनवाडंगाल) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. तिसऱ्या मुलाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

चारजणांपैकी तीनजण शालेय विद्यार्थी असून, एकजण महाविद्यालयात शिक्षण घेत होता. झारखंड येथील दुमका शहरात मयुराक्षी नदीच्या किनारी मिनी गोवा नावाचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ निर्माण करण्यात आले आहे. या पर्यटनस्थळाची लोकांमध्ये मोठी क्रेझ असून, मोठ्या संख्येने पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देत असतात.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, बचावकार्यास सुरुवात केली आहे. बेपत्ता मुलांचा अद्याप शोध सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT