Kalyan Banerjee Dainik Gomantak
देश

Kalyan Banerjee: TMC खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य, 'BJP कार्यकर्त्यांचे हात छाटू...'

TMC Vs BJP: तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी गुरुवारी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

TMC Vs BJP: तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी गुरुवारी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. धमकावल्यास आपले कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांचे हात छाटू शकतात, असे ते म्हणाले. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसच्या विशेष संघटनात्मक बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.

दरम्यान, टीएमसी (TMC) खासदाराच्या वक्तव्यावर भाजपने लगेच चोख प्रत्युत्तर दिले. त्यांच्या वक्तव्यावरुन टीएमसीची मानसिकता दिसून येते, असे भाजपने म्हटले आहे. तर दुसरीकडे, खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक वक्तव्य असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी म्हटले आहे.

'दीदींनी शांत राहण्यास सांगितले'

खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'दीदींनी मला शांत राहण्यास सांगितले आहे. त्यामुळेच मी शांत आहे. पण जर भाजप कार्यकर्त्यांनी आमच्याकडे बोट दाखवले किंवा आमचे हात तोडण्याची धमकी दिल्यास त्यांना सोडणार नाही.' कल्याण बॅनर्जी, एक व्यावसायिक वकील आणि हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत. ते पुढे म्हणाले की, 'इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाही.'

'कल्याण यांची भाषा बोलता येत नाही'

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'कल्याण बॅनर्जी यांची भाषण करण्याची एक शैली आहे. मला त्यांच्या भाषणशैलीनुसार बोलता येत नाही. पण काही नेते (Opponents) हात, पाय तोडण्याची भाषा बोलत आहेत. राजकारण कसे केले जाते, हे त्यांना कळायला हवे. सार्वजनिक ठिकाणी बोलताना प्रत्येकाने काळजी घ्यावी.'

दरम्यान, भाजप (BJP) नेते सिलभद्र दत्ता यांनी टीएमसी खासदारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 'टीएमसी नेते ज्या प्रकारची भाषा बोलत आहेत, त्यावरुन स्पष्ट होते की, त्यांची नेमकी मानसिकता काय आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT