Tihar Jail Dainik Gomantak
देश

Tihar Jail Received Bomb Threat: तिहार जेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु

Tihar Jail In Delhi: दिल्लीतील तिहार जेल उडवून देण्याची बॉम्बची धमकी मिळाली आहे. मंगळवारी ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली.

Manish Jadhav

Tihar Jail Received Bomb Threat: दिल्लीतील तिहार जेल उडवून देण्याची बॉम्बची धमकी मिळाली आहे. मंगळवारी ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली. तिहार प्रशासनाने या धमकीची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासन तातडीने सतर्क झाले. घटनास्थळी पोलीस आणि श्वानपथक शोध मोहीम राबवत आहेत. याआधी दिल्लीतील काही शाळा, रुग्णालये आणि विमानतळ उडवून देण्याच्या धमकीचे ईमेल पाठवण्यात आले होते.

आता, मंगळवारी courtisgod123@beeble.com या ईमेल आयडीवरुन दिल्लीतील तिहार जेल उडवून देण्याची धमकी देणारा मेल पाठवण्यात आला. पोलिसांनी धमकी देणाऱ्या ईमेलची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी सांगितले की, याच सर्व्हर (डोमेन) वरुन दिल्लीतील अनेक रुग्णालये आणि शाळांना धमकीचे ईमेल पाठवण्यात आले आहेत. आता हाच ईमेल तिहार तुरुंगात पाठवण्यात आला आहे.

तिहार तुरुंगातून मिळालेल्या धमकीच्या ईमेलमध्ये मी तुमच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याचे लिहिले आहे. हे सर्व बॉम्ब पुढील काही तासांत फुटतील. ही क्षुल्लक धमकी नाही. बॉम्ब निकामी करण्यासाठी तुमच्याकडे काही तास आहेत, नाहीतर इमारतीतील (तिहार जेल) निरपराधांचे रक्त तुमच्या हातावर असेल. तसेच, या हत्याकांडामागे 'कोर्ट' समूहाचा हात असल्याचे या ईमेलमध्ये खाली लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT