Death Dainik Gomantak
देश

MP: भिंडमध्ये विषारी दारु प्यायल्याने तिघांचा मृत्यू, दोन स्टेशन प्रभारी निलंबित

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भिंडमध्ये कथितरित्या बनावट दारु प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भिंडमध्ये कथितरित्या बनावट दारु प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. बनावट दारुमुळे मृत्यू झाल्याची घटना राऊण पोलिसांच्या इंदुरखी गावात रविवारी रात्री घडली. पोलीस (Police) अधिकाऱ्याने सांगितले की, अवैध दारु कारखान्यात मजूर म्हणून काम करणाऱ्या दोन लोकांनी कथितरित्या विषारी दारु प्यायली, त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, इंदुरखी गावात राहणारा 25 वर्षीय मनीष जाटव हा त्याचा धाकटा भाऊ छोटू जाटव याच्यासोबत भिंडच्या स्वतंत्र नगरमध्ये अवैध दारु बनवणाऱ्या कारखान्यात मजूर म्हणून काम करत होते. दोघेजण एकाच कारखान्यातून दारुच्या बाटल्या घेऊन गावाकडे निघाले होते. दोघांनीही दारु प्यायल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अवैध दारु पिल्याने दोन भावांचा मृत्यू झाला

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, उपचारादरम्यान मनीषचा भिंड जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेत तर छोटूचा गावाजवळील रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या घटनेच्या काही तासांनंतर, तिसरा व्यक्ती छोटू सिंग, ज्याने बनावट मद्य प्राशन केले होते, त्याचाही ग्वाल्हेरमधील रुग्णालयात मृत्यू झाला. अवैध दारु प्रकरणी भिंडचे पोलीस अधीक्षक शैलेंद्र सिंह चौहान यांनी रौण पोलीस ठाण्याचे प्रभारी उदयभान सिंह यादव आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी राजकुमार शर्मा यांना निलंबित केले असून, त्यांच्यासह पाच हवालदारांना हजर करण्यात आले आहे.

दोन पोलीस निलंबित, पाच लाईन स्पॉट

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतंत्र नगरजवळ अवैध दारुच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. कारखान्यातील बनावट दारु राऊण पोलीस ठाण्याच्या इंदुरखीगावपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले. रविवारी दोन सख्ख्या भावांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात, बनावट दारुमुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे. दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. एकाचा वाटेत तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी दोन स्टेशन प्रभारींना निलंबित करण्यात आले असून इंदुरखी बीटवर तैनात असलेल्या पाच जवानांना लाईनवर ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT